अर्थ मंत्रालय
पी. व्ही हरी कृष्णा, आयएएएस यांनी महालेखापाल (लेखापरीक्षण) पदाचा कार्यभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
02 NOV 2022 6:33PM by PIB Mumbai
मुंबई, 2 नोव्हेंबर 2022
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवेतील पी व्ही हरी कृष्णा यांनी 31 ऑक्टोबर 2022 पासून मुंबई, महाराष्ट्र येथे महालेखापाल (लेखापरीक्षण ) -I चा कार्यभार स्वीकारला आहे. एस के जयपूरियार यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पी. व्ही. हरी कृष्णा 2000 मध्ये भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवेत रुजू झाले.ते बंगळुरू विद्यापीठातून रेशीम शास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवीधर आहेत.यापूर्वी त्यांनी भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागात विविध पदांवर काम केले आहे आणि भारत सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवरही काम केले आहे .
N.Chitale/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1873188)
आगंतुक पटल : 698
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English