दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
विशेष मोहिम 2.0 अंतर्गत केंद्रीय दूरसंचार विभागाच्या परवाना सेवा क्षेत्र नागपूर युनिट द्वारा स्वच्छता अभियान
Posted On:
01 NOV 2022 8:25PM by PIB Mumbai
नागपूर, 1 नोव्हेंबर 2022
केंद्र शासनाच्या विशेष मोहिम 2.0 च्या अनुषंगाने 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत नागपूरच्या खामला टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग स्थित केंद्रीय दूरसंचार विभागाच्या अधीन महाराष्ट्र एलएसए -परवाना सेवा क्षेत्र नागपूर युनिटद्वारे रेकॉर्ड मॅनेजमेंट, स्वच्छता मोहीम, स्पेस मॅनेजमेंट प्लॅनिंग आणि भंगार विल्हेवाट हे उपक्रम राबवून कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला. या अभियानाअंतर्गत 1400 हून अधिक फायलींचे पुनरावलोकन केले गेले आणि सुमारे 1100 फायली वेगळ्या करण्यात आल्या. अनेक जुन्या आणि कालबाह्य झालेल्या 35 हून अधिक आयटी वस्तू ज्या विल्हेवाटीसाठी प्रलंबित होत्या त्या देखील भंगारात टाकल्या गेल्या आणि त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली गेली.
केंद्र शासनाच्या विशेष मोहिम 2.0 अंतर्गत शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता आणि प्रलंबित बाबींचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष मोहिमेकरीता प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग –डीएआरपीजी नोडल विभाग म्हणून नियुक्त करण्यात आला असून यात केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांचा समावेश असून विभाग आणि त्यांची संलग्न/ अधीनस्थ कार्यालये देखील यात समाविष्ट आहेत.
S.Rai/D.Wankhede/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1872837)
Visitor Counter : 147