वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी घेतला सिप्झ सेस इथे सुरू असलेल्या कामांचा आढावा
उच्च दर्जाची यंत्रांचा वापर आणि मेगा CFC सुविधेची झळाळी वाढेल असे नामकरण करण्याची आवश्यकता- केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री
Posted On:
22 OCT 2022 8:48PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज मुंबईतील अंधेरी इथल्या सिप्झ- सेझला भेट दिली आणि सुवर्ण महोत्सवी वर्षात सुरू केलेल्या विविध कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. सिप्झ- सेझचे रुप बदलून टाकणारा व्हर्जन 2.00 रीबुटेड अशा नावाने सुरू असलेला 200 कोटी रुपयांचा रुपांतरण प्रकल्प सिप्झ-सेझ मध्ये राबवण्यात येत आहे. त्याची आढावा बैठक ही मुख्यत्वे सिप्झ- सेझ मधील संबंधितांसाठी तसेच इथे कार्यरत असलेल्या युनिट साठी तयार मेगा कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारण्यावर मुख्यत्वे केंद्रित आहे. अमृत महोत्सवी वर्षातील सोहळ्याचा एक भाग असलेला हा प्रकल्प 1 मे 2023 पासून कार्यरत करण्याची योजना आहे.
मेगा CFC चे नामकरण हे त्याच्या झळाळीत भर टाकणारे असावे असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी सुचवले त्याचप्रमाणे तेथे उच्च दर्जाची यंत्रसामग्री आणण्याची गरज असण्यावर भर दिला. त्याचप्रमाणे GJEPC शिष्टमंडळाला कोणत्याही आघाडीवर तडजोड न करण्याचा सल्ला दिला.
या भेटीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रांना, सिप्झ-सेसचे विकास आयुक्त श्याम जगन्नाथन तसेच संयुक्त विकास सचिव (JDC), सी पी एस चव्हाण यांनी केंद्रीय मंत्र्यांना प्रकल्पाच्या सध्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली
वाणिज्य आणि उद्योग मंत्रांना कामाची क्रियान्वित असलेली प्रक्रिया, काही परवाने, होणारा विलंब आणि प्रकल्पाशी संबंधित इतर कामे यांची माहिती दिली या कामाच्या दैनंदिन अहवाल तयार करून नोंद केली जाते तसेच त्यावर चर्चा केली जाते अशीही माहिती त्यांनी दिली. रत्ने आणि आभूषण उद्योगाला तंत्रज्ञान विषयक सहाय्य करण्याच्या दृष्टीने तसेच या उद्योगाला विविध यांत्रिक सेवा, आधुनिक मशीनरी आणि उपकरणे पुरवण्याच्या दृष्टीने मेगा CFC ला अतिशय महत्त्व आहे. यामुळे दर्जा, उत्पादकता, मनुष्यबळ कौशल्य, स्वदेशी संशोधन व विकास, यांत्रिक आधुनिकता आणि स्पर्धात्मक किंमत यामध्ये वृद्धी होईल.
कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने तिथे प्रशिक्षण केंद्र असेल त्यामुळे उद्योगाला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ तिथेच विकसित होईल. मेगा CFC मधील संशोधन आणि विकास केंद्राचा उद्देश संशोधनाला प्रोत्साहन देणे तसेच जगभरातील बाजारपेठांमध्ये होणाऱ्या निर्यातीत हे उद्योग स्पर्धात्मक पातळीवर येण्यासाठी त्यांना अत्याधुनिकता देणे हाच असेल.
ही सुविधा रत्ने आणि आभूषणे उत्पादनांच्या आरेखन आणि उत्पादनासाठीच्या सेवा तसेच सहाय्य देण्याच्या उद्देशाने आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसहित सर्व आभूषणे प्रक्रिया केंद्रांची कार्यक्षमता वाढवण्याच्या या दृष्टीने मेगा सीएफसीची योजना केली आहे.
यामुळे मोठ्या गुंतवणुकी अंतर्भूत असलेल्या आणि युनिट्सना स्वतंत्रपणे न परवडणाऱ्या अशा सुविधा सर्वांसाठी मिळतील. हा एक सामाजिक प्रकल्प असून त्याला उद्योग प्रस्ताव म्हणता येणार नाही. मेगा CFC हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी 82.31 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
सिप्झ व्यवस्थापनाने सध्याचे कॉम्प्लेक्स अत्याधुनिक करत जागतिक दर्जाच्या सुविधा असलेल्या आत्याधुनिक परिसराला जागतिक दर्जाच्या सुविधा असलेल्या अत्याधुनिक स्मार्ट बिल्डिंग मध्ये रुपांतरीत करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये प्लग अँड प्ले या तत्वावर वापरता येणाऱ्य़ा जागतिक दर्जाच्या सुविधा असतील. याशिवाय उद्योगांसाठी आधुनित पायाभुत सुविधा आणि जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी व्यवसायही मिळेल.
सिप्झ सेस हे प्रिमियम सेझ म्हणून विश्वस्तरावर प्रोजेक्ट केले जात आहे. मेक इन इंडियावर ते आधारित आहे. आणि आत्मनिर्भर भारतमध्ये आपले योगदान देत आहे. रुपांतर आणि पुनर्विकास या आघाडींवर सिप्झ सेसने अनेक बदल केले आहेत.
रत्ने आणि आभुषणे युनिट्स एके ठिकाणी असणारे विश्वस्तरावरील सर्वात मोठे एकमेव केंद्र सिप्झ सेस आहे. आज सिप्झ सेस मध्ये कार्यरत असणाऱ्या युनिट्सची संख्या 182 झाली आहे. अमेरिका या जगातील सर्वात मोठ्या ग्राहकाला निर्यात होणाऱ्या आभुषणांपैकी एक चतुर्थांश भाग यांच्याकडून जातो. बाहेरील बाजारपेठांतील आभुषणांना सिप्झ आभुषणे म्हणून ओळखतात, अशा प्रकारे या भागाला उच्च दर्जाचा ब्रँड म्हणून ओळख आहे. भारताच्या रत्नजडीत आभुषणांच्य़ा निर्यातीपैकी 53% तर एकूण आभुषणांपैकी 31% निर्यात येथून होते.
***
S.Thakur/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1870336)
Visitor Counter : 167