युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नेहरू युवा केंद्र संगठनच्या पणजी शाखेच्या वतीने जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन


"गेल्या 50 वर्षांपासून नेहरू युवा केंद्र संगठन युवकांना प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याचे मोठे कार्य करत आहे" - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले कौतुक

नेहरू युवा केंद्र संगठन पणजी शाखेकडून राष्ट्रव्यापी विशाल स्वच्छ भारत स्वच्छता अभियान टप्पा 2.0 अंतर्गत स्वच्छता मोहिमेचे आयोजन

Posted On: 19 OCT 2022 4:47PM by PIB Mumbai

गोवा, 19 ऑक्टोबर 2022

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्र संगठन  (NYKS), पणजी यांच्या वतीने सांखली येथे आज पूर्ण दिवसाचा जिल्हास्तरीय युवा उत्सव (युवा महोत्सव) आयोजित करण्यात आला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.या महोत्सवात काव्य लेखन, लोकनृत्य, वक्तृत्व, चित्रकला अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने  तरुणांना एक व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी या महोत्सवात एक युवा-परीसंवाद आयोजित करण्यात आला होता.

यावेळी झालेल्या मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या अभिनव कल्पनेबाबत  त्यांची प्रशंसा केली.त्यांनी केलेल्या आवाहनावरूनच हा देशव्यापी जिल्हास्तरीय युवा महोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.  तरुणपणी एनवायकेएस(NYKS) चे सदस्य असल्याचे त्यांनी सांगितले.   1972 मध्ये संस्थेच्या स्थापनेपासून तरुणांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्यासाठी करण्यात आलेल्या  कार्याची सावंत यांनी  प्रशंसा केली. 'नव भारत'किंवा न्यू इंडिया विकसित करण्यात देशातील तरुणांची मोठी भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. 

या  महोत्सवाच्या उदघाटनापूर्वी, शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय सांखली, यांच्या सहकार्याने, एनवायकेएसने (NYKS)  केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग ठाकूर यांनी सुरू केलेल्या राष्ट्रव्यापी विशाल स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून स्वच्छता मोहीम देखील आयोजित केली होती. शाळेतील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.  या मोहिमेला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

या कार्यक्रमाला गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, क्रीडा आणि युवा कार्य संचालक अजय गावडे, नेहरू युवा केंद्र संगठन, पणजीचे उपसंचालक कालिदास घाटवाल, गोवा विद्यापीठाचे एनएसएस समन्वयक डॉ.नितीन सावंत यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

* * *

PIB Panaji | S.Kakade/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1869219) Visitor Counter : 190


Read this release in: English