संरक्षण मंत्रालय
80 वा इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स कोअर (ईएमई) दिन 15 ऑक्टोबर 2022 रोजी साजरा
Posted On:
15 OCT 2022 7:08PM by PIB Mumbai
पुणे, 15 ऑक्टोबर 2022
इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स कोअर यांनी 15 ऑक्टोबर 2020 रोजी 80 वा स्थापना दिवस साजरा केला. भारतीय सैन्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांच्या विशाल श्रेणीची देखभाल करण्याची जबाबदारी ईएमई कोअर वर असते. ईएमईच्या स्थापनेपासून म्हणजे 1943 पासून, या दलाने प्रत्येक आघाड्यांवर आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे आणि वेगळी ओळख निर्माण केली आहे. ईएमई चा हा सात दशकांचा प्रवास, त्यांच्या नैतिकतेचा मजबूत पाया, तंत्रकुशलता आणि अनुकरणीय व्यावसायिकतेच्या उदाहरणांनी परिपूर्ण आहे.
याप्रसंगी, दक्षिण कमांड मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ, लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया, यांनी लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन, परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक, एडीसी, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, दक्षिण कमांड यांच्या वतीने ईएमई कोअर च्या सर्व श्रेणीतील अधिकाऱ्यांचे, दर्जेदार कामगिरी कायम राखल्याबद्दल आणि कर्तव्याप्रती असलेल्या समर्पण भावनेबद्दल अभिनंदन केले. यापुढील काळातही अशाच भावनेने आणि निष्ठेने काम सुरू ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
* * *
PIB Pune | M.Iyengar/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1868104)
Visitor Counter : 168