दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
"महाराष्ट्र टपाल मंडल कार्यालयाकडून राष्ट्रीय टपाल सप्ताह 2022 चे आयोजन
टपाल खात्यामार्फत आज ‘वित्तिय सशक्तिकरण दिवस’ साजरा
Posted On:
10 OCT 2022 7:35PM by PIB Mumbai
मुंबई, 10 ऑक्टोबर 2022
सामान्य माणसाच्या आर्थिक सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी टपाल खात्याने आज (10 ऑक्टोबर 2022) ‘वित्तिय सशक्तिकरण दिवस’ साजरा केला. या अभियानांतर्गत, POSB/IPPB खाती उघडण्यासाठी आणि PLI/RPLI पॉलिसींच्या खरेदीच्या मोहिमेसह महाराष्ट्र टपाल मंडल कार्यालयाच्या प्रत्येक जिल्ह्यात मेळा आयोजित करण्यात आला आहे.
बर्न येथे मुख्यालय असलेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त जागतिक टपाल दिवस साजरा केला जातो. टपाल विभाग 09 ऑक्टोबर 2022 ते 13 ऑक्टोबर 2022 या कालावधीत राष्ट्रीय टपाल सप्ताह 2022 साजरा करत आहे.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना, मुख्य पोस्ट मास्टर जनरल वीणा आर श्रीनिवास यांनी माहिती दिली, “भारतीय टपाल खाते हा बचत बँकेला पर्याय आहे, परंतु आम्ही त्यासाठी संस्था म्हणून काम करत आहोत. आम्ही नेट-बँकिंग आणि मोबाइल-बँकिंग सुविधांही सुरू केल्या आहेत. आम्ही या सुविधा आयपीपीबी ग्राहकांनाही देतो.” योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीवर बोलताना, महाराष्ट्र टपाल मंडल च्या मुख्य पोस्ट मास्टर जनरलनी माहिती दिली की राष्ट्रीय स्तरावरील सुकन्या समृद्धी खात्यांपैकी 80 टक्क्यांहून अधिक खाती टपाल खात्याकडे आहेत.
'पोस्ट फॉर प्लॅनेट' या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करणारा 'जागतिक टपाल दिन' काल म्हणजे 9 ऑक्टोबर 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्र मंडलात, साजरा करण्यात आला. लोकांच्या आणि व्यवसायांच्या दैनंदिन जीवनात टपाल खात्याच्या भूमिकेबद्दल जागरुकता निर्माण करणे तसेच जागतिक सामाजिक आणि आर्थिक विकासात त्याचे योगदान उद्धृत करणे हा यामागील उद्देश आहे.
महाराष्ट्र टपाल मंडला तर्फे राष्ट्रीय टपाल सप्ताहाच्या उर्वरित दिवसातील नियोजित उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत:
11 ऑक्टोबर 2022 रोजी - 'फिलाटेली दिन': स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) संकल्पनेवर 9 विशेष लिफाफ्यांचे प्रकाशन.
12 ऑक्टोबर 2022 रोजी - 'मेल आणि पार्सल दिन' - 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सर्व प्रकारच्या इनबाउंड आणि आउटबाउंड मेलसाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त पोस्टमार्क कॅन्सलेशन जारी केले जाईल. मोठ्या ग्राहकांना पार्सल ट्रॅकर अंतर्गत नवीन उपक्रमाची माहिती देण्यासाठी ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले जाईल.
13 ऑक्टोबर 2022 रोजी – ‘अंत्योदय दिवस’ – टपाल खात्याच्या सामान्य माणसाच्या जीवनातील योगदानाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जाईल. ग्रामीण/दुर्गम भागात आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्ये जनजागृती सह आधार नोंदणी आणि अद्यावतन शिबिरे आयोजित केली जातील.
* * *
PIB Mumbai | S.Kane/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1866563)
Visitor Counter : 270