वस्त्रोद्योग मंत्रालय

'कन्व्हर्ज’-निफ्ट मुंबई आयोजित दोन दिवसीय क्रीडा, सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रम

Posted On: 09 OCT 2022 2:39PM by PIB Mumbai

 

खारघरमधील NIFT मुंबई कॅम्पसने 'कन्व्हर्ज' या दोन दिवसीय आंतर-कॅम्पस सांस्कृतिक आणि क्रीडा वार्षिक संमेलनाचे आयोजन केले आहे, ज्याची सुरुवात शनिवार, 09 ऑक्टोबर, 2022 रोजी झाली आहे. या दोन दिवसीय क्रीडा, सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमात सुमारे 25 इनडोअर, आउटडोअर आणि ऑनलाइन कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. पश्चिम विभागातील भोपाळ, गांधीनगर, जोधपूर आणि मुंबई हे चार NIFT कॅम्पस या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

वार्षिक संमेलनाच्या औपचारिक उद्घाटन कार्यक्रमाला नवी मुंबईचे पोलिस आयुक्त,सनदी अधिकारी बिपीन कुमार सिंग, पहिली फेमिना मिस इंडिया मेहर कॅस्टेलिनो, आणि अभिनेता नावेद अस्लम उपस्थीत होते.

NIFT मुंबईचे संचालक प्रा. (डॉ.) पवन गोदियावाला यांनी चारही NIFT कॅम्पसमधील सर्व मान्यवर, सहभागी विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी आणि सहाय्यकांचे स्वागत केले. डॉ. गोदियावाला यांनी  सहभागी सर्व विद्यार्थ्यांना, खिलाडूवृत्तीची भावना जागृत ठेवून शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या क्षमतेनुसार   उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करण्याचे आवाहन केले.

सहभागी विद्यार्थ्यांना संबोधित करताना बिपीन कुमार सिंग म्हणाले की, खेळ हा दैनंदिन जीवनाचा भाग असला पाहिजे आणि तो केवळ संस्थांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांपुरता मर्यादित राहू नये. त्यांनी यावेळी सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासामध्ये खेळ, ध्यान आणि योगाचे महत्त्व अधोरेखित केले. सिंह यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी दैनंदिन जीवनात खेळाचा समावेश करण्याचे आवाहन केले.

मेहर कॅस्टेलिनो यांनी विद्यार्थ्यांना खिलाडू वृत्ती आत्मसात करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, " खेळांमध्ये सहभागी होणे हे अधिक महत्त्वाचे आहे, जिंकणे आणि हरणे हा खेळाचा एक भाग आहे".

नावेद अस्लम यांनी सर्व सहभागींचे अभिनंदन केले आणि विविध कार्यक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी लेझीम खेळाचे सादरीकरण करून पाहुण्यांचे स्वागत केले. ढोल- ताशा हे एक मंगल वद्य/उत्सव वाद्य म्हणून ओळखले जाते.  आजच्या पहिल्या दिवशी विविध क्रीडा स्पर्धा: ॲथलेटिक्स, व्हॉलीबॉल, बास्केट-बॉल, बुद्धिबळ, साहित्यिक स्पर्धा: प्रश्नमंजुषा, वादविवाद, एडी मॅड, शायरी, प्रँकस्टर आणि सांस्कृतिक कार्यक्रम: ग्रुप डान्स, बॅटल ऑफ बँड्सचे आयोजन करण्यात आले होते.

***

M.Jaybhaye/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1866229) Visitor Counter : 164


Read this release in: English