संरक्षण मंत्रालय
वेस्टर्न फ्लीटने जिंकली 2022ची WNC नौकानयन स्पर्धा
Posted On:
07 OCT 2022 5:18PM by PIB Mumbai
मुंबई, 7 ऑक्टोबर 2022
2022 ची पश्चिम नौदल कमांड (WNC) नौकानयन स्पर्धा, 01 ते 06 ऑक्टोबर 22 दरम्यान कुलाबा, मुंबई येथील इंडियन नेव्ही वॉटरमॅनशिप ट्रेनिंग सेंटर (INWTC) येथे आयोजित करण्यात आली होती. यात आयएलसीए 6 (महिला), आयएलसीए 7 (पुरुष), बीआयसी नोव्हा आणि लेझर बाहिया या बोटींच्या चार प्रकारांमध्ये स्पर्धा होती.
महाराष्ट्र नौदल क्षेत्र, मुंबई क्षेत्र, COMCOS (डब्ल्यू), वेस्टर्न फ्लीट, कर्नाटक नौदल क्षेत्र आणि गोवा नौदल क्षेत्र या संघांनी सनक रॉक लाइट हाऊसशी 5-13 नॉट्सच्या वाऱ्याला तोंड दिले आणि प्रतिष्ठेचा WNC नौकानयन स्पर्धा चषक जिंकला.
स्पर्धेत आयएलसीए 6, आयएलसीए 7, बीआयसी नोव्हा वर्गातील सहा शर्यतींची मालिका आणि लेझर बाहिया मधील एकल राऊंड रॉबिन मालिकेमध्ये टीम आणि मॅच रेसिंगमधील दहा शर्यतींचा समावेश होता. आयएलसीए 6, आयएलसीए 7, बीआयसी नोव्हामधील स्पर्धेत वैयक्तिक बोट हाताळणी कौशल्ये अधोरेखित केली गेली होती, तर सांघिक आणि सामना स्पर्धेत कॉम्रेडशिप, रणनीतिक कौशल्य, क्रीडा आक्रमकता आणि उत्कृष्ट सांघिक कार्याचे प्रदर्शन केले.
वेस्टर्न फ्लीटने सांघिक स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर गोवा नेव्हल एरिया आणि कॉमकॉस (W) यांच्या पंक्तीत स्थान मिळविले. INWTC (Mbi) येथे 06 ऑक्टोबर 22 रोजी आयोजित समारोप समारंभात पश्चिम नौदल कमांड मुख्यालय मधील कमोडोर आशुतोष रिधोरकर यांनी विजेत्यांना पदके प्रदान केली.
* * *
PIB Mumbai | S.Patil/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865871)
Visitor Counter : 183