सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

खादी ग्रामोद्योग आयुक्तालयात गांधी जयंती साजरी

Posted On: 02 OCT 2022 10:04PM by PIB Mumbai

 

ज्यांना सार्वजनिक जीवनात यायचे आहे, त्यांनी, समाजसेवा करावी, चरखा चालवावा आणि खादीचा वापर करावा, असा सल्ला महात्मा गांधी देत असत. त्यांच्या सल्यानुसार आचरण करत, खादी आणि ग्रामोद्योग आयुक्तालयात, आज गांधी जयंती साजरी करण्यात आली. 

महात्मा गांधींच्या 153 च्या जयंतीनिमित्त, खादी आणि ग्रामोद्योग आयुक्तालयाच्या मुख्यालयासह, राज्यस्तरीय /विभागीय कार्यालयात महात्मा गांधींच्या स्मृतीना उजाळा दिला.

यावेळी केव्हीआयसीच्या मुंबई इथल्या मुख्यालयात महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.केव्हीआयसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, संघमित्रा आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण करत, कार्यक्रमाची सुरुवात केली.

यावेळी बोलतांना, त्यांनी उपस्थित सर्वांना महात्मा गांधींची मूल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले तसेच, खादीचे एक तरी वस्त्र घेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केल्याचे, स्मरण करून दिले. त्यानंतर त्यांनी, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खादीचा अंगीकार आणि प्रचार करण्याची शपथ दिली. यंदाची गांधी जयंती आपल्यासाठी विशेष आहे, कारण आपण सर्व सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत, असे त्या पुढे म्हणाल्या. यानिमित्त, भजन, व्याख्याने आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

त्यानंतर परिसरात एक स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली.

गेल्या दोन दशकांपासून, खादी आणि ग्रामोद्योग खादी महोसत्व आयोजित करत आहे. मात्र गेली दोन वर्षे, कोविड महामारीमुळे, त्यांचे आयोजन करता आले नव्हते.  त्यामुळे तीन वर्षांच्या अवकाशानंतर, यंदा, 2 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या महिनाभरात, खादी महोसत्व आयोजित करण्यात आला आहे.

***

S.Bedekar/R.Aghor/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1864604) Visitor Counter : 156


Read this release in: English