वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
“सिप्झ” चा दानशूरपणा
Posted On:
01 OCT 2022 6:25PM by PIB Mumbai
मुंबईतील, सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेस झोन (सिप्झ) ने, सहृदयता आणि दानशूरपणाचा परिचय देत, त्यांच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त, टाटा मेमोरियल हॉस्पिटलला 1.21 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
सिप्झच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या समारंभाची सुरुवात आज एक ऑक्टोबरपासून, तीन दिवसांच्या रक्तदान शिबिराने करण्यात आली. संध्याकाळी विशेष, सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले.
संस्थेच्या रक्तदान शिबिरात, 5000 लोकांनी रक्तदानासाठी नोंदणी केली. त्यापैकी 2000 लोकांनी पहिल्याच दिवशी रक्तदानही केले. यामुळे, 5000 युनिट रक्तसाठा तयार होणार आहे.
आपल्या ह्या सत्कार्याची फारशी प्रसिद्धी व्हावी, अशी सिप्झची इच्छा नव्हती, मात्र, तरीही या सामाजिक मोहिमेकडे अनेक स्वयंसेवक आकर्षित झाले. त्यामुळे टाटा रुग्णालयात, रक्तदात्यांची अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी जमा झाली. अशा वेळी टाटा व्यवस्थापन अधिकाऱ्यांनाही, सिप्झ युनिटच्या स्वयंसेवकांनी व्यवस्थापनात मदत केली.
ह्या रक्तदान मोहिमेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद बघता, भविष्यात एक मॅरेथॉन घेण्याचाही सिप्झचा विचार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला, क्षेत्रीय विकास अधिकारी, श्याम जगन्नाथन यांनी मंचावर, मान्यवर पाहुण्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
उपस्थित मान्यवरांमध्ये प्रमुख पाहुणे आणि पद्मश्री पुरस्कार विजेते एच के ग्रुपचे अध्यक्ष सावजीभाई धनजीभाई ढोलकिया, सन्माननीय अतिथी म्हणून माजी पोलिस महासंचालक आणि रोटी बँकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डी शिवानंदन, एसजीजेएमएचे अध्यक्ष राजीव शंकर पंड्या, एच के डिझाईनचे व्यवस्थापकीय संचालक घनश्याम ढोलकिया आणि क्रिएशन ज्वेलरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सेझ प्राधिकरणाचे सदस्य आदिल कोतवाल उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांना स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता गांधीजींच्या “वैष्णव जन ते…” या भजनाने झाली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यासारखा पेहराव केलेल्या काही स्वयंसेवकांनी हे भजन सादर केले.
सी पी सिंह चौहान यांनी आभार प्रदर्शन केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'संस्कृती के रंग, सिप्झ के संग और कॅन्सर से जंग' हा संगीतमय कार्यक्रम उत्सवाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आला आहे.
***
Source SEEPZ/PIB Mumbai
S.Kakade/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1864171)
Visitor Counter : 177