अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयकर आयुक्त (सूट), पुणे कार्यालयातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खुली निबंध लेखन स्पर्धा

Posted On: 01 OCT 2022 3:26PM by PIB Mumbai

 

      आयकर आयुक्त (सूट) कार्यालय, पुणे यांच्या तर्फे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या प्रीत्यर्थ  खुली निबंध लेखन स्पर्धा दिनांक ०२/१०/२०२२ रोजी आयोजित करण्यात येणार आहे त्यानुसार सन २०२२-२०२३ या वर्षाकरिता निबंध स्पर्धेसाठी खालील विषय निवडण्यात आले आहेत.

इयत्ता ८ वी ते १० वी साठी

  • भारतीय अर्थव्यवस्था : आव्हाने आणि भविष्यातील मार्गक्रमण
  • भारताच्या सक्षमीकरणात प्राप्तिकराचे योगदान

यासाठी कमाल शब्द मर्यादा २००० असेल.

 

इयत्ता 11 वी ते 12 वी साठी

  • काळ्या पैशाचा भस्मासूर : राष्ट्राच्या प्रगतीतील अवरोधक
  • राष्ट्रउभारणीमध्ये कर प्रशासनाची अनन्यसाधारण भूमिका

यासाठी कमाल शब्द मर्यादा 3००० असेल.

 

पारितोषिके  

इयत्ता ८ वी ते १० वी साठी प्रथम पारितोषिक : रुपये ७,५००/-, द्वितीय पारितोषिक : रुपये ५,०००/-, तृतीय पारितोषिक : रुपये ३,०००/-, उत्तेजनार्थ पारितोषिके : ५ = रुपये १,०००/-

इयत्ता ११ वी ते १२ वी साठी प्रथम पारितोषिक : रुपये १०,०००/- द्वितीय पारितोषिक : रुपये ७,५००/- तृतीय पारितोषिक : रुपये ५,०००/- उत्तेजनार्थ पारितोषिके : ५ = रुपये २,०००/-

उपरोक्त निबंध हा वरील पैकी कोणत्याही एक विषयावर इंग्रजी किंवा मराठी तून सादर करावा. सदर निबंध हा विषयाच्या अनुषंगाने विश्लेषणात्मक, संशोधनवर असणे अपेक्षित आहे. निबंध खाली दिलेल्या गूगल फॉर्म लिंक वर प्रस्तुत करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. सदर लिंक दिनांक ०२/१०/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजे पासून रात्री १०.०० वाजे पर्यंत खुली असेल.

Google Forms Link for 8th to 10th std.

https://forms.gle/dotKMhLQZQU2CTHC9

Google Forms Link for 11th to 12th std.

https://forms.gle/Kz9Dvd9DE1JozkcU8

 

      निबंधाचे मूल्यमापन हे आयकर आयुक्त (सूट ), पुणे च्या परीक्षक मंडळाकडून करण्यात येईल. योग्य त्या गुणवत्तेचा निबंध नसल्यास स्पर्धकास पारितोषिक न देण्याचा किंवा पारितोषिकाची रक्कम कमी करण्याचा अधिकार आयकर आयुक्त (सूट ), पुणे यांच्याकडे राखून ठेवला आहे. पारितोषिक देण्याबाबत आयकर आयुक्त (सूट ), पुणे यांचा निर्णय अंतिम राहील.

***

आयकर आयुक्त (सूट ), पुणे /PIB Mumbai/MC/PK

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1864106) Visitor Counter : 1506


Read this release in: English