माहिती आणि प्रसारण मंत्रालय
68 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात फिल्म्स डिव्हिजनच्या दोन माहितीपटांना रौप्य कमळ प्रदान
Posted On:
30 SEP 2022 8:25PM by PIB Mumbai
मुंबई, 30 सप्टेंबर 2022
68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात फिल्म्स डिव्हिजनच्या दोन माहितीपटांना रौप्य कमळ प्रदान करण्यात आल्याने फिल्म्स डिव्हिजनसाठी हे अभिमानाचे क्षण ठरले. 68 व्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात नॉन-फीचर श्रेणीमध्ये "व्हीलिंग द बॉल" आणि "पबन श्याम" या माहितीपटांना सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात आज प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासह विविध श्रेणींमध्ये 2020 साठीचे पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
नवी दिल्लीतील विज्ञान भवन.येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा, परीक्षक मंडळाचे अध्यक्ष आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

1. व्हीलिंग द बॉल - सर्वोत्तम शोध/साहसी चित्रपट
(42 मिनिटे / हिंदी आणि इंग्रजी / Col / 2020 )
-मुकेश शर्मा दिग्दर्शित / फिल्म्स डिव्हिजन निर्मित
चार महिला व्हीलचेअर बास्केटबॉल खेळाडूंची वास्तव जीवन कथा यात कथित केली आहे. त्यांची खेळासाठीची उत्कटता,आवड यांचा शोध माहितीपटात घेण्यात आला आहे.

2. पबन श्याम - सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपट
( 53 मिनिटे / मणिपुरी (EST) / Col/2020)
-होबम पबन कुमार दिग्दर्शित / फिल्म्स डिव्हिजन निर्मित
हा चरित्रपट पबन श्याम यांच्या जीवनाचा आणि कार्याचा त्यांच्या एका प्रशंसक आणि विद्यार्थ्याच्या नजरेतून आढावा घेतो.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक रवींद्र भाकर म्हणाले, “फिल्म्स डिव्हिजनने भारतातील माहितीपट चळवळीचे नेतृत्व केले आहे आणि अनेक उत्कृष्ट माहितीपट तयार केले आहेत. या वर्षी प्राप्त दोन राष्ट्रीय पुरस्कारांमुळे फिल्म्स डिव्हिजनने गेल्या काही वर्षांत भारतात आणि परदेशात जिंकलेल्या शेकडो पुरस्कारांमध्ये भर पडली आहे.”

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत सर्वात जुने माध्यम युनिट असलेले फिल्म्स डिव्हिजन, माहितीपटांसाठी निधी, मार्गदर्शन आणि वाव शोधून स्वतंत्र माहितीपट निर्मितीला प्रोत्साहन देत आहे.
गेल्या 67 वर्षांपासून, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, भारत सरकारचा देशातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार असून भारतीय चित्रपटाच्या संपूर्ण राष्ट्रीय पैलूंचा समावेश करून कलात्मक, सक्षम आणि अर्थपूर्ण चित्रपट करण्यासाठी उत्कृष्टता अधोरेखित करतो.
* * *
PIB Mumbai | S.Kane/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1863930)
Visitor Counter : 196