माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पोषण महिना: केंद्रीय संचार ब्युरो गोवा ने तीन तालुक्यांमध्ये केले जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन
पाककृती स्पर्धा, प्रबोधनपर व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा झाला पोषण महिना 2022
Posted On:
30 SEP 2022 6:37PM by PIB Mumbai
गोवा, 30 सप्टेंबर 2022
केंद्रीय संचार ब्युरो, (सीबीसी) गोवा कार्यालयाने महिला आणि मुलांमध्ये आरोग्यदायी खाण्याच्या पद्धती आणि खाण्याच्या सवयींबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी तीन तालुक्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. राष्ट्रीय पोषण माह 2022 अंतर्गत गोवा उपजीविका मंच आणि गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियान यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

डिचोली तालुक्यात बुधवार, 28.09.2022 रोजी मायेम पंचायत सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मये पंचायतीचे सरपंच दिलीप शेट, उप सरपंच सुफला चोपडेकर आणि गोवा आजिविका मंचाच्या सचीव आशा वेर्णेकर यावेळी उपस्थित होते. गुरुवार, 29.09.20202 रोजी सत्तरी तालुक्यातील शासकीय उच्च माध्यमिक शाळा, वाळपई येथे आणि शुक्रवार, 30.09.2022 रोजी खोर्ली पंचायत सभागृहातही अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
M7OT.JPG)
या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी आणि पोषणतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याला पोषक खाण्याच्या पद्धतींचे महत्त्व आणि पोषक आहाराच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांवर लक्ष ठेवण्याची गरज, या विषयावरील सत्रे झाली.

पार्श्वभूमी:
पोषण अभियाना अंतर्गत 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण माह, म्हणजेच राष्ट्रीय पोषण महिना साजरा केला जातो. लहान मुले, गरोदर महिला, स्तनदा माता आणि नागरिकांच्या पोषणामध्ये सुधारणा घडवण्यासाठीचा भारत सरकारचा हा प्रमुख कार्यक्रम आहे. नवजात बालके आणि लहान मुलांना अपुरा आणि अयोग्य आहार देण्याच्या पद्धती, गरोदरपणादरम्यान आणि पौगंडावस्थेतील पोषण आणि काळजीचे महत्व आणि पिढ्यानुपिढ्या सुरु असलेले कुपोषणाचे चक्र खंडित करण्यासाठी चांगल्या आरोग्य पद्धतींबद्दल जागरुकता या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच परिवर्तनात्मक बदलाला प्रोत्साहन देण्यासाठी पोषण मास दरम्यान वर्तणूक बदल संवाद हे महत्वाचे धोरण म्हणून सिद्ध झाले आहे.
यंदाच्या वर्षी, राष्ट्रीय पोषण मास अंतर्गत, देशभरात ‘महिला आणि आरोग्य’, ‘मूल आणि शिक्षण’, लिंग संवेदनशील जल-व्यवस्थापन आणि आरोग्यदायक स्वदेशी अन्न या विषयावर भर देणारे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
O26G.JPG)
* * *
PIB Panaji | S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1863878)