शिक्षण मंत्रालय
एनआयटी गोवा 30 सप्टेंबर रोजी आठव्या पदवीदान समारंभात 209 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करणार
Posted On:
28 SEP 2022 7:40PM by PIB Mumbai
गोवा, 28 सप्टेंबर 2022
एनआयटी गोवा या संस्थेचा आठवा पदवीदान सोहळा 30 सप्टेंबर 2022 रोजी राज भवनात दरबार हॉलमध्ये होणार आहे. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्ले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील, तर आयआयटी बॉम्बेचे संचालक सुभासिस चौधरी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असतील. एनआयटीचे संचालक प्रो. मुगेरया यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की यावर्षी संस्था 209 विद्यार्थ्यांना बी टेक, एम टेक आणि पीएचडी प्रदान करणार आहे. 135 विद्यार्थ्यांना बी टेक, 57 विद्यार्थ्यांना एम टेक आणि संशोधन करणाऱ्या 17 विद्यार्थ्यांना पीएचडी देण्यात येईल.
यशस्वी विद्यार्थ्यांना नामवंत कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या असून यंदा त्यांच्यामध्ये वार्षिक 44 लाख रुपयांचे सर्वोच्च पॅकेज आणि सरासरी 13 लाख रुपयांच्या पॅकेजचा समावेश आहे, अशी माहिती मुगेरया यांनी दिली. त्या व्यतिरिक्त 90% पेक्षा जास्त पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अतिशय नामवंत कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला असून सर्वाधिक वार्षिक 21.69 लाख रुपये आणि सरासरी 10.59 लाख रुपयांच्या पॅकेजचा समावेश आहे. इतर काही विद्यार्थ्यांनी आयआयटीएस आणि एनआयटीएसमध्ये प्रवेश घेतला आहे आणि जगभरातील नामवंत परदेशी विद्यापीठांमध्ये एमएस करण्याला आणि पीएचडी करण्याला प्राधान्य दिले आहे. संस्थेने देशव्यापी एनआयआरएफ मूल्यांकनात अभियांत्रिकी श्रेणीमध्ये 88वे स्थान मिळवले आहे.
संशोधन क्षेत्रात, संस्थेकडे सुमारे 17 कोटी रुपयांचे 43 प्रकल्प असून विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय यांसारख्या संशोधनाला अर्थसहाय्य पुरवणाऱ्या विविध संस्थांच्या अध्यापक सदस्यांनी हाती घेतले आहेत. एनआयटी गोवा ने "उन्नत भारत अभियान (UBA) अंतर्गत "राष्ट्रीय आविष्कार अभियान (RAA) अंतर्गत शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना देखील प्रशिक्षण दिले आहे. संस्थेने शाश्वत विकासासाठी गोव्यातील 5 गावे दत्तक घेतली आहेत आणि तेथे क्षेत्र भेटी, घरोघरी आणि गाव पातळीवर सर्वेक्षण आणि ऑनलाइन प्रश्नमंजुषा सारखे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत .
एनआयटी गोवा लवकरच गोव्यातील कनकोलिम येथील नवीन संकुलात स्थलांतरित होणार असल्याची माहिती संचालकांनी दिली.
* * *
PIB Panaji | S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1863118)
Visitor Counter : 131