दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
गोवा टपाल खात्याकडून सुकन्या समृद्धी महोत्सवाचे आयोजन
गोवा टपाल विभागाने सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलींसाठी 38650 खाती उघडली
Posted On:
26 SEP 2022 6:41PM by PIB Mumbai
गोवा, 26 सप्टेंबर 2022
गोवा टपाल विभागाने शनिवारी वास्को येथे सुकन्या समृद्धी महोत्सवाचे आयोजन केले होते. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि सुकन्या समृद्धी योजनेची यशोगाथा साकारण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोवा टपाल विभागाला सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत 38650 खाती उघडण्यात यश आले आहे. सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी अल्प बचतीची योजना आहे. या योजनेअंतर्गत, 10 वर्षांखालील मुलीचे खाते उघडले जाऊ शकते, जे ते मुलीचे शिक्षण आणि लग्नाचा खर्च भागवण्यासाठी उपयोगी येते.

या कार्यक्रमात शैक्षणिक प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थिनींचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान सुकन्या समृद्धी खात्याची काही पासबुकही मुलींना देण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती दीपाली नाईक, संचालिका, महिला व बाल विकास संचालनालय यांनी सुकन्या समृद्धी योजनेच्या जनजागृतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले आणि महिला आणि मुलींसाठीच्या विविध सरकारी योजनांची माहिती दिली. प्राचार्य श्रीमती अनुपमा मेहरा, नेव्ही चिल्ड्रन स्कूल, चिखली, एम. नरसिंह स्वामी, वरिष्ठ टपाल अधीक्षक आणि टपाल खात्याचे अधिकारी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात पालक आणि शिक्षकांसह 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
* * *
PIB Panaji | S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1862319)
Visitor Counter : 164