रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

न्यू आष्टी-अहमदनगर नवीन रेल्वेमार्गाचे उद्घाटन  तसेच न्यू आष्टी -अहमदनगर दरम्यान पहिल्या डेमू सेवेला हिरवा झेंडा

Posted On: 23 SEP 2022 5:47PM by PIB Mumbai

 

न्यू आष्टी-अहमदनगर दरम्यान पहिल्या डेमू सेवेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी न्यू आष्टी रेल्वे स्थानकावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री  रावसाहेब दादाराव  पाटील दानवे उपस्थित होते.  तत्पूर्वी  फलकाचे अनावरण करून नव्या  आष्टी-अहमदनगर या 66  किमीच्या नवीन मार्गाचे उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र सरकारचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलमाजी मंत्री  पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि डॉ. सुजय विखे पाटील, आमदार सुरेश धस आणि राम शिंदे, विधानपरिषदेचे सदस्य  बाळासाहेब आजबे आणि  लक्ष्मण पवार आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि नगराध्यक्ष  पल्लवी धोंडे या वेळी उपस्थित होते.

आष्टी-अहमदनगर डेमू सेवेची पार्श्वभूमी आणि त्याचे फायदे

  • 66 किमी लांबीची नवी आष्टी-अहमदनगर ब्रॉडगेज लाईन ही अहमदनगर -बीड-परळी वैजनाथ या नवीन ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा एक भाग आहे. याच्या खर्चात  केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा  50-50 वाटा आहे.
  • ही डेमू सेवा नव्या आष्टी-अहमदनगर पट्ट्यातील नागरिकांना तसेच आसपासच्या परिसरातल्या रहिवाशांना उत्तम कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करेल.
  • यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल आणि परिणामी मराठवाडा प्रांताच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल.
  • डेमू गाडी अहमदनगरहून सकाळी 07.45 वाजता सुटेल आणि न्यू आष्टीला सकाळी 10.30 वाजता पोहोचेल आणि परत येताना  न्यू आष्टी इथून सकाळी 11.00 वाजता सुटेल आणि दुपारी 1.55 वाजता अहमदनगरला पोहोचेल. ही गाडी रविवार वगळता दररोज धावणार आहे.
  • ही डेमू गाडी कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी आणि नारायण डोहो येथे थांबेल.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1861814) Visitor Counter : 227
Read this release in: English