विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सीएसआयआर-एनआयओत 26 सप्टेंबर रोजी प्रदर्शनाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
23 SEP 2022 4:44PM by PIB Mumbai
सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) 81व्या स्थापना दिनानिमित्त वैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत संस्थेच्या कामकाजाची माहिती देणारे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. सकाळी 11.30 वाजता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘समुद्र विज्ञानातील करियर संधी’ या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना सागरी संशोधनासंबंधीची माहिती चित्रपटांच्या माध्यमातूनही दिली जाणार आहे. तसेच संशोधनविषय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने केले आहे.
***
GSK/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1861754)
आगंतुक पटल : 163
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English