दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

टपाल विभागाची 29 सप्टेंबर रोजी विभागीय डाक आणि पेन्शन अदालत

Posted On: 22 SEP 2022 12:37PM by PIB Mumbai

गोवा, 22 सप्टेंबर 2022

टपाल विभागाकडून 29 जून 2022 रोजी, सकाळी 11 आणि दुपारी 12 वाजता वरिष्ठ टपाल अधीक्षक, गोवा विभाग, पणजी यांच्या कार्यालयात डाक आणि पेन्शन अदालतीचे अनुक्रमे आयोजन करण्यात आले आहे.

टपाल सेवेसंबंधी पत्रसेवा, स्पीड पोस्ट, कुरिअर सेवा, बचत बँक, मनी ऑर्डर आणि निवृत्तीधारक यासंबंधीच्या ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झाले नाही, अशा तक्रारींची दखल या अदालतीत घेतली जाईल. अर्जदाराने तक्रारीचा पूर्ण तपशील कार्यालयाकडे 27.09.2022 पूर्वी पाठवण्याचे आवाहन टपाल विभागाने केले आहे. तक्रारदार/ निवृत्तीवेतनधारक स्वखर्चाने डाक आणि पेन्शन अदालतीसाठी उपस्थित राहू शकतात.

 

 

 PIBPanaji/SRT/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1861431) Visitor Counter : 121


Read this release in: English