वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
आंतरराष्ट्रीय सहकार्य (आयसी) योजनेत पहिल्याच वेळी सहभागी होणाऱ्या एमएसई निर्यातदार (सीबीएफटीई) घटकाची क्षमता वाढवण्यासाठी एमएसएमई मंत्रालयाने ईसीजीसीची नोडल संस्था म्हणून केली नियुक्ती
Posted On:
20 SEP 2022 6:18PM by PIB Mumbai
मुंबई, 20 सप्टेंबर 2022
मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाने सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी, (एमएसई) त्यांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्यवसायाच्या विविध टप्प्यांवर प्रोत्साहन देण्यासाठी, एक योजना सुरू केली आहे. मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय सहकार्य (आयसी) योजनेत पहिल्याच वेळी सहभागी होणाऱ्या एमएसई निर्यातदार (सीबीएफटीई) घटकाची क्षमता वाढवण्यासाठी भारतीय निर्यात पत हमी महासंघ, ईसीजीसीची नोडल संस्था म्हणून नियुक्ती केली आहे.

एमएसएमई मंत्रालय आणि ईसीजीसी लिमिटेड यांच्यात आज दिनांक 20.09.2022 रोजी नवी दिल्ली इथे एमएसएमईचे सचिव, सनदी अधिकारी बी.बी. स्वाइन यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या सामंजस्य कराराअंतर्गत, ईसीजीसी लघु निर्यातदार विमा असलेल्या एमएसई निर्यातदारांनी भरलेला निर्यात पत विमा हफ्ता, आता एमएसएमई मंत्रालयाकडून प्रतिपूर्तीसाठी पात्र असेल.
मंत्रालयाने विहित केलेल्या दस्तऐवजांसह प्रतिपूर्ती दावा सादर केल्यावर, एमएसएमई मंत्रालयाद्वारे योजनेंतर्गतचे अनुदान ईसीजीसीला प्रतिपूर्ती आधारावर जारी केले जाईल. एमएसएमई मंत्रालयाकडून प्राप्त झालेली रक्कम, नंतर ईसीजीसीद्वारे लाभार्थ्यांना हस्तांतरित केली जाईल. एका आर्थिक वर्षात निर्यातदाराला प्रतिपूर्तीपोटी जास्तीत जास्त 10,000/- रुपये किंवा प्रत्यक्ष नुकसानभरपाईची एकूण रक्कम, यापैकी जे कमी असेल ते मिळू शकेल.
योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी पात्रता निकष आहेत:
i) सूक्ष्म आणि लघु उद्योग (एमएसई) असायला हवा. त्याची वैध उदयम नोंदणी झालेली हवी.
ii)एमएसईचा आयात निर्यात कोड क्रमांक निर्यात शिपमेंटच्या तारखेला 3 वर्षांपेक्षा जुना नसावा
iii)हफ्ता भरल्याचा पुरावा
वरील योजना उत्पादन क्षेत्रातील एमएसई निर्यातदारांना लागू आहे
R.Aghor /V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1860915)
Visitor Counter : 174