नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॉरिटी- जेएनपीएने 814 हेक्टर खारफुटीचे क्षेत्र महाराष्ट्र सरकारकडे केले सुपूर्त

Posted On: 14 SEP 2022 7:11PM by PIB Mumbai

मुंबई, 14 सप्टेंबर 2022

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) महाराष्ट्र सरकारच्या, वन विभागाच्या मॅन्ग्रोव्ह सेलकडे 814 हेक्टर खारफुटीचे  क्षेत्र सुपूर्त  केले. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी आणि जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांच्या उपस्थितीत जेएनपीएने खारफुटीचे क्षेत्र महाराष्ट्र सरकारला हस्तांतरित केले.

जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी यावेळी सांगितले,   आम्ही महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर (एमआरएसएसी) ने केलेल्या, भौगोलिक माहिती  प्रणाली (जीआयएस)-आधारित मॅनग्रोव्ह मॅपिंगनुसार पर्यावरण संवर्धनासाठी 814 हेक्टर खारफुटी क्षेत्र महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्द केले आहे. आम्ही नैसर्गिक अधिवासांचा आदर करतो आणि  वनस्पती आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी काम करतो. जेएनपीए शाश्वत विकासासाठी वचनबद्ध आहे आणि बंदर परिसरातील पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी विविध उपक्रम आणि उपाययोजना राबवते.

जवाहरलाल नेहरू बंदराने  एक कृती आराखडा तयार केला आहे. त्यात बंदरातील माल  हाताळणी, साठवण, निर्वासन आणि पर्यावरण संरक्षणाशी संबंधित इतर  सर्व बाबींचा  समावेश आहे. बंदराने पर्यावरण व्यवस्थापन आणि देखरेख योजना (इएमएमपी) देखील तयार आणि लागू केली आहे. काही ग्रीन पोर्ट उपक्रमांमध्ये हरित क्षेत्राचा अधिक  विस्तार, जवाहरलाल नेहरू बंदरात एलइडी दिवे वापरणे, ई-वाहनांचा वापर, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन इत्यादींचा समावेश त्यात आहे.

व्यवसायाच्या पलीकडे मूल्यनिर्मिती  आणि व्यवसायाच्या केंद्रस्थानी शाश्वत विकास ठेवणे आणि शाश्वत भविष्य निर्माण करणे हे जेएनपीएचे तत्त्वज्ञान आहे.

 

 

 

 

S.Kulkarni /P.Jambhekar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1859316) Visitor Counter : 193


Read this release in: English