आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 विषयीची अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
14 SEP 2022 9:23AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविडविरोधी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसींच्या एकूण 215 कोटी 67 लाख मात्रा (94.57 कोटी दुसऱ्या मात्रा आणि 18.70 कोटी वर्धक मात्रा यांच्यासह) देण्यात आल्या आहेत
गेल्या 24 तासांत 19,25,881 मात्रा देण्यात आल्या.
भारतातील कोविड-सक्रीय रूग्णांची संख्या सध्या 45,749इतकी आहे
भारतातील कोविड-सक्रीय रूग्णांचे प्रमाण सध्या 0.1% इतके आहे
सध्याचा रोगमुक्ती दर 98.71% टक्के इतका आहे
गेल्या 24 तासांत, 5,675 रूग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत कोरोना मुक्त झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 4,39,36,092 इतकी झाली आहे
गेल्या 24 तासांत, 5,108 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे
दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 1.44% आहे
साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 1.70% आहे
आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 89 कोटी 02 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत; गेल्या 24 तासांत 3,55,231 चाचण्या करण्यात आल्या.
***
GopalC/SanjanaC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1859116)
आगंतुक पटल : 174