श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खाण मजूरांच्या पाल्यांसाठीच्या शैक्षणिक सहाय्यता शिष्यवृत्तीत वाढ

Posted On: 12 SEP 2022 2:22PM by PIB Mumbai

 

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने महाराष्ट्र आणि गोवा राज्य, तसेच दादरा, नगर हवेली आणि दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशातील खाण कामगारांच्या पाल्यांसाठी असलेल्या शैक्षणिक सहाय्यता शिष्यवृत्तीत चालू शैक्षणिक वर्ष म्हणजेच 2022-23 साठी वाढ केली आहे. 

https://scholarships.gov.in  या राष्ट्रीय स्कॉलरशिप पोर्टलवर वाढीव शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. विडी कामगार, चूना आणि डोलोमाईट, लोह-मँगनीज खाणीतील मजुरांच्या पाल्यांसाठी पहिली ते चौथी 1,000 रुपये, पाचवी- आठवी 1500 रुपये, इयत्ता नववी-दहावीसाठी 2,000 रुपये, अकरावी-बारावीसाठी 3,000 रुपये, आयटीआय, पॉलिटेक्निक, बी एस्सी कृषीसह इतर पदवीसाठी 6,000 रुपये आणि बी.ई., एमबीबीएस, एमबीएसाठी 25,000 रुपये अशी शिष्यवृत्ती मिळेल. पूर्व-मॅट्रिक साठीच्या ऑनलाईन अर्जासाठी 30 सप्टेंबरपर्यंत आणि दहावीनंतरच्या अभ्यासक्रमासाठीच्या ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्जासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे.

ऑनलाईन अर्जातील अडचणी, शिष्यवृत्तीसंबंधी सविस्तर माहितीसाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या नागपूर कल्याण आयुक्तालयात 0712-2510200  या दूरध्वनी क्रमांकावर किंवा wcngp-labour[at]nic[dot]in या ई-मेलवर संपर्क करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

***

S.Thakur/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1858683) Visitor Counter : 174


Read this release in: English