आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

राज्य/केंद्रशासित प्रदेश यांच्याकडे असलेली कोविड-19 लसमात्रांची उपलब्धता


राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 202 कोटी 53 लाखांहून अधिक लसींच्या मात्रांचा पुरवठा

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे 4 कोटी 39 लाखांहून जास्त, न वापरलेल्या लसमात्रा शिल्लक

Posted On: 12 SEP 2022 9:31AM by PIB Mumbai

संपूर्ण देशभरात कोविड-19 लसीकरणाची व्याप्ती आणि गती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. संपूर्ण देशभर लसीकरण, 16 जानेवारी 2021 रोजी सुरू झाले. जागतिक कोरोना- 19 लसीकरणाचा नवा टप्पा 21 जानेवारी2021 रोजी सुरू झाला. जास्तीत जास्त लसींची उपलब्धता, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लस उपलब्धतेची आगाऊ माहिती, त्यांच्याद्वारे चांगले नियोजन करणे आणि लस पुरवठा साखळी सुव्यवस्थित करणे याद्वारे लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे.

देशव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून भारत सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड लस मोफत पुरवून त्यांना मदत करत आहे. COVID19 लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या नवीन टप्प्यात, केंद्र सरकार  देशातील लस उत्पादकांकडून 75 टक्के लसी खरेदी करुन त्यांचा विनामूल्य पुरवठा, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करीत आहे.

VACCINE DOSES

 

(As on 12th September 2022)

 

SUPPLIED

 

2,02,53,52,325

 

BALANCE AVAILABLE

 

 

4,39,87,660

 

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 202.53 कोटी (2,02,53,52 ,325) पेक्षा जास्त लसमात्रा (विनामूल्य पध्दतीने) देण्यात आल्या आहेत. 

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे 4.66 कोटी (4,66 ,55 ,930) पेक्षा अधिक न वापरलेल्या आणि उरलेल्या लसींच्या मात्रा अजूनही उपलब्ध आहेत.

 

 ***


Gopal C/Sampada/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1858624) Visitor Counter : 185