संरक्षण मंत्रालय
196 व्या गनर्स डे च्या निमित्ताने मोटरसायकल कम ट्रेक मोहीम
Posted On:
10 SEP 2022 4:53PM by PIB Mumbai
तोफखाना रेजिमेंटने 196 वा गनर्स डे साजरा केला. 1827 मध्ये 5 बॉम्बे माउंटन बॅटरी या पहिल्या तोफखाना युनिटची स्थापना करण्यात आली होती. या निमित्त पुणे ते नवी दिल्ली अशी 10 रायडर्सचा समावेश असलेली 12 दिवसांची मोटरसायकल कम ट्रेक मोहीम तोफखाना संचालनालयाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. 10 सप्टेंबर 2022 रोजी पुणे येथून अग्निबाज विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल अनूप जाखड यांच्या हस्ते ‘अग्निबाज ब्रिगेड’ च्या रायडर्सना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. भारतीय तोफखान्याच्या सर्व श्रेणींमध्ये अभिमान आणि यशाची भावना जागवणे , सौहार्द, नेतृत्वगुणांना चालना देणे आणि जवान आणि विद्यार्थ्यांमध्ये साहसाची भावना मजबूत करणे हा या टीमचा उद्देश आहे.

ही मोहिम भारतीय सैन्याची प्रतिमा आणि विविध युद्धे आणि मोहिमांमध्ये तोफखाना रेजिमेंटने दिलेले योगदान लोकांपर्यंत पोहचवेल.

***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1858302)
Visitor Counter : 150