आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नागपूर येथील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राची केली पायाभरणी

प्रविष्टि तिथि: 06 SEP 2022 8:20PM by PIB Mumbai

मुंबई/नवी दिल्‍ली, 6 सप्‍टेंबर 2022

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रांच्या महाराष्ट्र आणि इतर पाच राज्यांमधल्या शाखांची  पायाभरणी केली. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रांची महाराष्ट्रातील शाखा आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालयाजवळ उभारली जाईल.

ही नागपूरमधील शाखा 2 एकर जमिनीवर वसवली जाणार आहे. नागपूरमधील या प्रकल्पासाठी 18 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

उपस्थित  मान्यवरांमध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हेसुद्धा या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयातील आरोग्य सेवा महासंचालक  अतुल गोयल, तसेच आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अगरवाल हेदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते. 


* * *

PIB Mumbai | S.Kakade/V.Sahjrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1857227) आगंतुक पटल : 1254
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English