संरक्षण मंत्रालय
खडकीच्या लष्करी रुग्णालयात 'स्पाइनल कॉर्ड इंज्युरी डे' (पाठीचा कणा दुखापत दिवस) साजरा करत, मानवाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा गौरव
Posted On:
05 SEP 2022 7:11PM by PIB Mumbai
पुणे, 5 सप्टेंबर 2022
खडकीच्या लष्करी रुग्णालयात असलेल्या स्पाइनल कॉर्ड इंज्युरी केंद्रात आज आंतरराष्ट्रीय स्पाइनल कॉर्ड इंज्युरी डे(पाठीचा कणा दुखापत दिवस) 2022 साजरा करण्यात आला. ज्यांनी आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून अलीकडील विविध आंतरराष्ट्रीय पॅरा-ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदकांची कमाई केली आहे असे जवळपास 200 पॅराप्लेजिक्स (पक्षाघात झालेले), क्वाड्रिप्लेजिक्स( हातापायांना पक्षाघात झालेले) आणि टेट्राप्लेजिक( दोन्ही हात पायांना पक्षाघात झालेले) आपल्या कुटुंबीयांसह या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या रूग्णांनी,आपण रुग्णखाटेवर पडण्यापासूनच्या,आपल्या असहायतेवर मात करत उच्च कामगिरी करणाऱ्या पॅराॲथलीट बनण्यापर्यंतच्या संघर्षाच्या कथांनी उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. पॅराप्लेजिक रिहॅब सेंटरच्या रहिवाशांनी एक संगीतमय कार्यक्रम देखील आयोजित केला होता.
अशा असामान्य प्रतिभांशी बोलून त्यांच्या माणसाच्या संकटावर मात करण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची ओळख पटते. आपले कर्तव्य बजावताना नशिबाने त्यांना एक दुर्दैवी आघात दिला, मात्र मणक्याच्या दुखापतींच्या याच आजाराने त्यांचे जीवन बदलले, परंतु खडकीच्या या लष्करी रुग्णालयात, ‘पाठीचा कणा दुखापत पथका’च्या मदतीने आणि कुटुंब आणि मित्रांच्या पाठिंब्याने त्यांनी असा अलौकिक पराक्रम गाजवला, ज्यासाठी सुदृढ शरीराच्या व्यक्तींनाही संघर्ष करावा लागतो.
लेफ्टनंट जनरल आर रामसेथू, कमांडंट AFMC हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे होते, त्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले आणि सशस्त्र दलातील स्पाइनल कॉर्ड केअरच्या इतिहासाला गौरव प्राप्त करून देणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार केला. हे केंद्र दिवंगत एअर मार्शल एएस चहल यांच्या संकल्पनेतून साकार झाले आहे,ज्यांनी ब्रिटन मधील प्रसिद्ध स्टोक मँडेविले सेंटरच्या धर्तीवर त्याचे मॉडेल बनवले होते. मेजर जनरल भूपेश के गोयल, व्हीएसएम कमांडंट सीएच(एससी) यांनी, समाजात अशा आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्याकरता आणि समाजाला आपल्या प्रतिबंधाच्या भूमिकेबद्दल संवेदनशील राहण्याकरता तसेच आरोग्यसेवा क्षेत्रात जागरूकता निर्माण करण्यासाठी असे कार्यक्रम साजरे करण्याच्या भूमिकेवर जोर दिला.
भारतीय सशस्त्र दल, युद्ध आणि शांतता या दोन्ही ठिकाणी स्वत:च्या सैनिकांची काळजी घेत. पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या रुग्णांवर उपचार करुन, त्यांना बरे केले जाते आणि पुण्यातील खडकीच्या लष्करी रुग्णालयात, स्पाइनल कॉर्ड इज्युरी सेंटरमध्ये त्यांचे पुनर्वसन केले जाते. खरे तर ही किचकट आणि दीर्घकालीन प्रक्रिया जखमींसाठी आणि त्याची काळजी घेणाऱ्या चमूसाठीही अनेकदा वेदनादायक आणि नाउमेद करणारी असते. परंतु चिकाटीने कार्य केल्याचा सकारात्मक परिणाम हळूहळू होतो. समर्पित चिकित्सक, नर्सिंग कर्मचारी, पुनर्वसन तज्ञ या अत्याधुनिक केंद्रामध्ये ट्रॉमा पॅराप्लेजिक रुग्णांच्या जीवनात आशा आणि अर्थ आणण्यासाठी चोवीस तास काम करतात. खडकीच्या लष्करी रुग्णालयातील हे केंद्र अशा रूग्णांसाठी अत्यंत आवश्यक असलेले पुनर्वसन आणि सामाजिक ऐक्य निर्माण करणारे केंद्र ठरले आहे.
* * *
PIB Pune | R.Aghor/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1856894)
Visitor Counter : 184