आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवण्यात आलेल्या कोविड-19 प्रतिबंधक लसमात्रांची ताजी स्थिती
201.21 कोटीहून अधिक लसमात्रांचा पुरवठा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आला आहे
6.29 कोटीहून अधिक शिल्लक आणि न वापरलेल्या लसमात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही शिल्लक
Posted On:
28 AUG 2022 10:29AM by PIB Mumbai
देशभरात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. देशव्यापी कोविड19 प्रतिबंधक लसीकरणाला 16 जानेवारी 2021पासून सुरूवात झाली. कोविड19 प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा 21 जून 2021पासून सुरू झाला. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टीने लसींची अधिक उपलब्धता, लसीच्या साठ्याविषयी आगाऊ सूचना आणि लसींची पुरवठा साखळी सुनियोजित करणे या माध्यमातून लसीकरण मोहिमेची गती वाढवण्यात आली आहे.
देशव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून, भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसींचा पुरवठा विनामूल्य करत आहे. कोविड19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या नवीन टप्प्यात केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांद्वारे 75 टक्के लस खरेदी करून त्या लसींचा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना (विनामूल्य) पुरवठा करत आहे.
VACCINE DOSES
|
(As on 28th Aug 2022)
|
SUPPLIED
|
2,01,21,42,325
|
BALANCE AVAILABLE
|
6,29,02,190
|
आतापर्यंत केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 201.21 कोटी (2,01,21,42,325) लसीच्या मात्रा विनामूल्य आणि थेट राज्य अधिग्रहण श्रेणीच्या माध्यमातून पुरवल्या आहेत.
6.29 कोटीहून अधिक (6,29,02,190) शिल्लक आणि न वापरलेल्या कोविड प्रतिबंधक लसमात्रा अजूनही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत.
***
S.Tupe/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1854945)
Visitor Counter : 147