संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीने केला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा अभ्यास दौरा

प्रविष्टि तिथि: 25 AUG 2022 8:43PM by PIB Mumbai

पुणे, 25 ऑगस्ट 2022

श्री जुआल ओरम यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षणविषयक संसदीय स्थायी समिती (SCoD) च्या सदस्यांनी 25 ऑगस्ट 2022 रोजी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला भेट दिली.

संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीची ही  अभ्यास भेट विविध  माध्यमातून सशस्त्र दलात महिला अधिकार्‍यांच्या प्रवेशाचा आढावा घेण्यासाठी होती.   समितीच्या माननीय सदस्यांना एअर मार्शल संदेश पी वागळे, वायु सेना पदक, उप प्रमुख इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ  यांच्यासह व्हाइस अॅडमिरल अजय कोचर, अति विशिष्ट सेवा पदक, नौसेना पदक आणि तिन्ही सेना दलांचे प्रतिनिधी यांनी माहिती दिली.

संसदीय सदस्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील प्रशिक्षणाच्या विविध पैलूंबद्दल सर्वसमावेशक माहिती देण्यात आली. विशेषतः अलीकडेच दाखल झालेल्या महिला  कॅडेट्सच्या प्रशिक्षणाबद्दल त्यांना अवगत करण्यात आले.

समितीने कॅडेट्स प्रशिक्षणाच्या विविध पैलूंचे आयोजन देखील अनुभवले आणि नव्याने समाविष्ट झालेल्या महिला कॅडेट्सशी संवाद साधला.

 

M.Iyengar/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1854508) आगंतुक पटल : 197
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English