संरक्षण मंत्रालय
मुंबईतील मेरीटाईम वॉरफेअर सेंटर इथे संरक्षण वार्ताहरांसाठी अभ्यासक्रम -2022 ची सुरुवात
Posted On:
23 AUG 2022 2:21PM by PIB Mumbai
मुंबई, 23 ऑगस्ट 2022
प्रादेशिक व राष्ट्रीय माध्यम संस्थांमध्ये कार्यरत संरक्षण क्षेत्रात पत्रकारिता करणाऱ्या निवडक वार्ताहरांसाठी संरक्षण मंत्रालयातर्फे चालवलेला तीन आठवड्यांचा अभ्यासक्रम मुंबईतील मेरीटाईम वॉरफेअर सेंटर (MWC ) इथे सोमवार, 22 ऑगस्ट 2022 रोजी सुरु झाला. पश्चिमी नौदल कमांडच्या चीफ ऑफ स्टाफ यांनी याप्रसंगी उदघाटनाचे भाषण केले व मेरीटाईम वॉरफेअर सेंटर (MWC )च्या संचालकांनी 30 सहभागी पत्रकारांचे स्वागत केले. सैन्यदलाशी संबंधित बातम्यांचे लिखाण अथवा प्रसारण करताना पत्रकारांना तिन्ही दलांची व विशेषतः नौदलासंबंधी पूरेपूर माहिती असावी यासाठी हा अभ्यासक्रम तयार केला आहे.

या अभ्यासक्रमात सर्व सहभागी एका आठवड्यासाठी नौदल क्षेत्राशी संलग्न राहतील. या काळात नौदल व तटरक्षक दलाचे विशेषज्ञ सहभागींना मार्गदर्शन करणार आहेत. त्या अंतर्गत नौदलाच्या मोहीमा, नाविक मुत्सद्देगिरी, नौदल करत असलेले आपत्ती व्यवस्थापनाचे व मानवतेच्या दृष्टिकोनातून करत असलेले काम, नौदल व तटरक्षक दलाची संरचना इत्यादी बाबींची माहिती सहभागी पत्रकारांना देण्यात येईल. या दरम्यान सहभागींना नौदलाची व तटरक्षक दलाची जहाजे, पाणबुड्या तसेच नौदल गोदी ला भेट देण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे एका उत्तम प्रतीच्या युद्धनौकेला त्यांची भेट आयोजित केली असून समुद्रावर प्रत्यक्ष चालणाऱ्या नौदल मोहिमेचे निरीक्षण सहभागींना करता येणार आहे.


S.Thakur/U.Raikar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1853829)
Visitor Counter : 249