अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

अणुभट्ट्या आणि अणुउर्जा विभागाचे उर्जा विरहित तंत्रज्ञान याविषयांवर आधारित आठवडाभर चालणाऱ्या आयकॉनिक प्रदर्शनाला आजपासून प्रारंभ


आण्विक विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अणुउर्जा विभागाचे सामर्थ्य दर्शवणारे प्रदर्शन

Posted On: 22 AUG 2022 8:50PM by PIB Mumbai

मुंबई, 22 ऑगस्‍ट 2022

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचा भाग म्हणून अणुउर्जा विभागाने 22 ऑगस्ट म्हणजेच आजपासून 28 ऑगस्टपर्यंत अणुभट्ट्या आणि अणुउर्जा विभागाचे  उर्जा विरहित तंत्रज्ञान याविषयांवर  आधारित आयकॉनिक प्रदर्शन आयोजित केले आहे.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून अणुउर्जा विभागाचे आण्विक विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सामर्थ्य दिसून येईल. यामध्ये आण्विक इंधन चक्राचा  आरंभिक टप्पा म्हणजेच (आण्विक अणुभट्ट्यांसाठी इंधन निर्मिती प्रक्रियेतले विविध टप्पे आणि पैलू) ते अंतिम टप्पा (खर्च झालेल्या इंधनाची पुनर्प्रक्रिया आणि कचरा व्यवस्थापन) आणि अणुभट्टी तंत्रज्ञान (विविध प्रकारच्या आण्विक अणुभट्टीच्या रचना) यांचे सध्या अस्तित्वात असलेले तंत्रज्ञान आणि भविष्यातील रूपरेषा यांचा समावेश आहे.

हवामान बदलाच्या जागतिक समस्येला तोंड देण्यासाठी अणुउर्जेच्या आवश्यकतेवर या प्रदर्शनात भर दिला आहे. या व्यतिरिक्त, या प्रदर्शनामध्ये, रेडिओ-आयसोटोप आणि प्रवेगकांचा वापर तसेच मूलभूत संशोधनात न्यूट्रॉन आणि गॅमा किरणोत्सर्गाचा  वापर यांसारख्या कृषी, औषध आणि उद्योगधंद्यांमध्ये  समाजाच्या हितासाठी वापरल्या जाणाऱ्या  अणुऊर्जा विभागाच्या ऊर्जा विरहित तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

मुंबईतील अणुशक्ती नगर येथील डीएई कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाला भेट देण्याची वेळ दुपारी 2 ते संध्याकाळी 7  वाजेपर्यंत आहे. हे प्रदर्शन 28 ऑगस्ट 2022 पर्यंत सुरू राहणार आहे.   खालील लिंक वापरून प्रवेश नोंदणी  करता येईल: https://in.eregnow.com/ticketing/barc

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1853704) Visitor Counter : 189


Read this release in: English