वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
'अपेडा' मुंबईतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने विविध उपक्रम
Posted On:
17 AUG 2022 6:20PM by PIB Mumbai
मुंबई, 17 ऑगस्ट 2022
'अपेडा' अर्थात कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण, मुंबईने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. दूरदृश्य माध्यमातून व्यापारी मेळावे, शेतकऱ्यांना जोडणारे पोर्टल, ई-कार्यालय, हॉर्टिनेट ट्रेसेबिलिटी सिस्टम, खरेदीदार विक्रेत्यांच्या बैठका, खरेदीदार विक्रेत्यांच्या पुनर्बैठकांचे आयोजन, उत्पादन केन्द्रीत मोहीमा यांचा यात समावेश आहे. राज्य सरकारसोबत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि राज्यातून निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अपेडा काम करत आहे.

अपेडाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने विशेष कार्यक्रमांची मालिका आयोजित केली आहे. 15 हून अधिक निर्यात प्रोत्साहन उपक्रमांचे आयोजन अपेडाने केले. यात क्षमता निर्माण कार्यक्रम तसेच एमएसएएमबी, केव्हीके, कृषी विद्यापीठे, एफपीओ, राज्य सरकारी संस्थांच्या सहकार्याने उत्पादन केन्द्रित दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करणे याचा समावेश आहे. राज्यात जळगावची केळी, नागपूरची संत्री, रत्नागिरीचा हापूस, नाशिकची द्राक्षे आणि इतर ताजी फळे तसेच भाजीपाला यांसारख्या उत्पादनांच्या समूह विकासासाठी अपेडा झटून काम करत आहे.

अपेडा आणि नागपूरच्या मेसर्स ॲग्रोव्हिजन फाउंडेशन यांनी संयुक्तपणे कृषी पिके/फळे आणि भाजीपाला निर्यातीच्या संभाव्यतेवर दोन कार्यक्रमांचे आयोजन केले होते – पहिला 9 ऑक्टोबर 2021 रोजी नागपुरात आणि दुसरा अमरावती जिल्ह्यात 17 जुलै 2022 रोजी झाला. कार्यक्रमांचे उद्घाटन माननीय केन्द्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. अपेडाने नागपूर इथल्या आयसीएआर-केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेसोबत (आयसीएआर-यीसीआरआय), नागपूर इथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
मिलेट्स एफपीओ/निर्यातदार, काजू निर्यातदार, सेंद्रिय निर्यातदार यांच्यासाठी क्षमता निर्माण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले. तर एसटी/एससी उद्योजक, महिला उद्योजक आणि अपेडाच्या नवीन नोंदणीकृत निर्यातदारांना लाभ पोहचावा यासाठी जागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
* * *
PIB Mumbai | S.Kakade/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1852664)
Visitor Counter : 187