संरक्षण मंत्रालय

नौदलाच्या पश्चिम कमांड इथे स्वातंत्र्य दिन संचलनाचे आयोजन

Posted On: 15 AUG 2022 5:55PM by PIB Mumbai

मुंबई, 15 ऑगस्‍ट 2022

 

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत, आयएनएस शिक्रा इथे 15 ऑगस्ट 2022 रोजी संचलनाचे आयोजन करण्यात आले. नौदलाच्या पश्चिम कमांडचे (ध्वजाधिकारी) फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, यांनी 50 सैनिकांच्या पथकाची मानवंदना  स्विकारली. त्यांनी नंतर सर्व जहाजे, पाणबुड्या आणि किनार्‍यावरील आस्थापनांमधून निवडलेल्या नौदल कर्मचार्‍यांचा समावेश असलेल्या पलटणीचा आढावा घेतला.  या संचलनावेळी मुंबईतील सर्व ध्वज अधिकारी आणि कमांडिंग अधिकारी उपस्थित होते.

कमांडर-इन-चीफ यांनी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड इथल्या गौरव स्तंभ, सागरी स्मारकावर पुष्पहार अर्पण करून राष्ट्रसेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व जवानांना आदरांजली वाहिली.

व्हाइस अॅडमिरल सिंग यांनी संचलनाला संबोधित सर्व सहभागी जवानांचे, त्यांच्या कुटुंबांचे आणि देशवासियांचे आपल्या देशाने स्वतंत्र राष्ट्र म्हणून 75 वर्षे पूर्ण केल्याच्या महत्त्वपूर्ण प्रसंगी अभिनंदन केले.

आपल्या देशाच्या वाढ आणि विकासाचे विविध महत्त्वाचे टप्पे आत्मनिर्भर भारत - India@75 याचा संदर्भ देत अॅडमिरल यांनी विशद केले. त्यांनी भारतीय नौदलाचे आधुनिक नौदलात झालेले परिवर्तन आणि नौदलाने देशाच्या विकासात दिलेल्या अनेक योगदानांचेही वर्णन केले.  India@100 (भारत 100 वर्ष पूर्ण करताना) आणखी चैतन्यदायी, मजबूत आणि आत्म-आश्वासक असेल, तसेच भारतीय नौदल, राष्ट्राच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही असेही त्यांनी सांगितले.

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, बंदरातील जहाजे  ध्वजांनी सजवण्यात आली असून  पश्चिम नौदल कमांडचे सर्व तळ तिरंगी रंगात सजवले आहेत.

* * *

PIB Mumbai | S.Kane/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1852071) Visitor Counter : 117


Read this release in: English