नौवहन मंत्रालय

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने हर घर तिरंगा ही संकल्पना साकारत साजरा केला स्वातंत्र्य दिन

Posted On: 15 AUG 2022 5:50PM by PIB Mumbai

मुंबई, 15 ऑगस्‍ट 2022

 

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA), हे  भारतात सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर  असून त्यांनी आज भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या संकल्पनेला महत्त्वपूर्ण रीतीने मूर्त स्वरूप देत साजरा केला.

जेएनपीए प्रशासकीय इमारतीत  आयोजित केलेल्या सोहळ्यात संपूर्ण जेएनपोर्ट परिवार सहभागी झाला होता.. जेएनपीए उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील अधिकारी यांच्या उपस्थितीत जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण अध्यक्ष संजय सेठी  यांच्या हस्ते ध्वजारोहण करून या उत्सवाला सुरुवात झाली, त्यानंतर राष्ट्रगीत गायन झाले.

"आज आपला स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना आपण जेएनपीटी मधे गेल्या एक वर्षापासून आझादी का अमृत महोत्सव यानिमित्ताने आपण केलेल्या उत्कृष्ट कामगिरीवर प्रकाश टाकणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले,ज्यामुळे राष्ट्राच्या वैभवात वैविध्यपूर्ण भर घातली गेली",असे स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थितांना संबोधित करताना जेएनपीटीचे अध्यक्ष डॉ. संजय सेठी म्हणाले.

भारताच्या बंदर आणि सागरी क्षेत्राने  देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि जेएनपोर्ट त्यात गेली 33 वर्षे आपले योगदान देत आले आहे.

आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा, आपण आता  भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर म्हणून आगामी काळात देशाच्या वैभवाला जागतिक स्तरावर अधिक उंचीवर घेऊन जाऊ या."असेही ते पुढे म्हणाले.

त्यानंतर जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी कोविड 19 महामारीविरुद्धच्या लढ्यात लसीकरण मोहिमेत आघाडीवर असलेल्या जेएनपीए रुग्णालयात कार्यरत परीचारिका उज्वला निखालजे आणि परीचारिका  सुषमा म्हात्रे यांचा सत्कार केला.

गेल्या वर्षभरात, बंदराने नौवहन आणि जलमार्ग, मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जेएनपीए,आझादी का अमृत महोत्सव याअंतर्गत कर्मचार्‍यांसाठी आणि इतर नागरीकांसाठी  देखील अनेक उपक्रम राबविले.

मोफत आरोग्य तपासणी शिबिरे,बंदर क्षेत्राबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी बंदराला भेटी तसेच विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम,वृक्षारोपण असे विविध उपक्रम आयोजित केले होते.

सर्व कर्मचाऱ्यांना, कामगारांना जेएनपीएचे विश्वस्त आणि भागधारक यांना  संजय सेठी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर देशभक्ती या विषयावर सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने स्वातंत्र्यदिन सोहळ्याची सांगता झाली.


* * *

PIB Mumbai | S.Kane/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1852069) Visitor Counter : 135


Read this release in: English