माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'हर घर तिरंगा’ इंडिया@75:75 लोक 75 तिरंगा झेंडे घेऊन मांडवी मार्गे 75 मिनिटांच्या बोट रॅलीमध्ये झाले सहभागी


फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त आयोजित शासकीय मल्टीमीडिया प्रदर्शनाला समाजकल्याण मंत्री  सुभाष फळदेसाई यांनी दिली भेट

Posted On: 14 AUG 2022 8:38PM by PIB Mumbai

 

केंद्रीय संचार ब्युरो गोवा (CBC) आणि भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण  मंत्रालयाने, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या देशव्यापी 'हर घर तिरंगा' मोहिमेचा एक भाग म्हणून आज (रविवार, 14 ऑगस्ट) रोजी तिरंगा बोट रॅलीचे आयोजन केले.

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, 75 तिरंग्यांसह 75 लोक 'हर घर तिरंगा' ब्रँडिंगने सजवलेल्या क्रूझ बोटीतून मांडवी नदीतून 75 मिनिटे काढलेल्या रॅलीमध्ये सहभागी झाले.

1 गोवा बटालियन एनसीसी पणजीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एमके एस राठोड यांनी रविवारी सकाळी 11.30 वाजता पणजी येथील मांडवी पुलाखालून टुरिझम जेट्टी येथे या बोट रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.

कर्नल राठोड म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या नावाने देशभरात साजरा केला जाणारा सोहळा स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली आहे ज्यांच्यामुळेच देश स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकला आहे. देशाला अधिक विकासाच्या दिशेने घेऊन जाताना युवकांनी स्वातंत्र्यसैनिकांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन कर्नल राठोड यांनी केले.

रॅलीदरम्यान क्रूझवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा मोहिमेवरील सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

पणजी बसस्थानकावरील प्रदर्शनाला चांगला पाठिंबा मिळत आहे

आझादी का अमृत महोत्सवआणि हर घर तिरंगामोहिमेचा एक भाग म्हणून केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने पणजी बसस्थानकावर मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त आज समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी प्रदर्शनाला भेट दिली.

अशाप्रकारचे प्रदर्शन भरवल्याबद्दल CBC च्या प्रयत्नांचे मंत्री महोदयांनी कौतुक केले. ते म्हणाले, प्रदर्शनामुळे जगभरातील लोकांना भारताचा इतिहास, फाळणीच्या काळातील भीषणता आणि दुःख आणि आपला देश अडचणींवर कसा मात करतो हे जाणून घेण्यास मदत करेल.

या प्रदर्शनामध्ये  फाळणी वेदना स्मृती दिनाविषयी एक विशेष विभाग आहे. फाळणीचे वर्णन करणारे फलक, फाळणीच्या वेळी लोकांना अत्यंत प्रतिकूल हवामानात कसा त्रास सहन करावा लागला आणि भारत आणि पाकिस्तान दरम्यान लोकांची ने-आण करण्यासाठी रेल्वेचा कसा वापर केला गेला याबाबत सांगण्यात आले आहे.

या प्रदर्शनाला समाजातील सर्व स्तरातून चांगला पाठिंबा मिळत आहे, विशेषत: युवक प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर खूप उत्साही आहेत. इतिहासाबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्यासाठी या प्रदर्शनातून उपयुक्त माहिती मिळत आहे आहे. आमच्या विकासासाठी अशा प्रकारची प्रदर्शने नक्की मदत करतील, असे या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शंतनू यांनी सांगितले.

हे मल्टीमीडिया प्रदर्शन पणजी बस स्टँड येथे 17 ऑगस्ट 2022 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.

***

S.Patil/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1851919) Visitor Counter : 114


Read this release in: English