संरक्षण मंत्रालय
दक्षिण कमांडचे आर्मी कमांडर,लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन, यांची गोवा लष्करी केंद्राला भेट
Posted On:
14 AUG 2022 9:35PM by PIB Mumbai
दक्षिण कमांडचे आर्मी कमांडर, लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन, यांनी 12 ते 14 ऑगस्ट 2022 या कालावधीत गोवा लष्करी केंद्राला भेट दिली.
या तीन दिवसांच्या मुक्कामादरम्यान, त्यांनी मुख्यालय 2 सिग्नल्स ट्रेनिंग सेंटरला भेट दिली आणि चालू प्रकल्प, प्रशिक्षण आणि, कल्याण याविषयीच्या मुद्द्यांचा आढावा घेतला. नोव्हेंबर 2022 मध्ये नियोजित अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीच्या भरती प्रक्रियेच्या आणि प्रशिक्षणाच्या योजनेबद्दल त्यांना 2 सिग्नल्स ट्रेनिंग सेंटरच्या कमांडंट यांनी माहिती दिली. जीओसी -इन-सी( GOC-in-C) यांनी प्रशिक्षण केंद्राच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्याबद्दल मौल्यवान सल्ला दिला.
लष्करप्रमुखांनी बांबोलीम मिलिटरी कॅम्पलाही भेट दिली,आणि मिलिटरी रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.जनरल नैन यांनी गोवा लष्करी केंद्राच्या सर्व अधिकाऱ्यांचे त्यांच्या व्यावसायिकतेबद्दल कौतुक केले आणि आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत नुकत्याच आयोजित कार्यक्रमांमध्ये प्रदर्शित झालेल्या नागरी लष्करी संपर्काचे कौतुक केले.
***
S.Patil/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1851911)
Visitor Counter : 153