दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय टपाल खात्याच्या महाराष्ट्र टपाल मंडल कार्यालयाकडून आतंरराष्ट्रीय युवा दिन साजरा
भारतीय टपाल खात्यातर्फे महाराष्ट्र आणि गोव्यातील युवा आयकॉन्सना सलामी देण्यासाठी विशेष कॅन्सलेशन जारी
Posted On:
14 AUG 2022 1:30PM by PIB Mumbai
आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, महाराष्ट्र टपाल मंडल कार्यालयाने महाराष्ट्र आणि गोव्यातील युवा आयक़ॉन्स प्रति आदर व्यक्त करण्यासाठी एक विशेष कॅन्सलेशन जारी केले आहे. हा युवा आयकॉन्सच्या पोस्टकार्डाच्या आकाराच्या छायाचित्रांचा संच आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्या ललिता बाबर या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या.

या प्रसंगी मुख्य पोस्टमास्तर जनरल वीणा श्रीनिवास यांनी जागतिकीकरणातील नव्या जगात सामाजिक भांडवल निर्माण करण्यासाठी युवा आयकॉन्स अत्यंत महत्वपूर्ण आहेत, यावर जोर दिला.

महाराष्ट्र मंडलचे पोस्टमास्तर जनरल (मेल्स आणि बीडी) अमिताभ सिंग म्हणाले की, आमच्या देशाचे भवितव्य युवक आहे आणि युवा आयकॉन्सचा सन्मान केल्याने समाजात नवीन प्रणेते तयार होतील.
ललिता बाबर यांनी आरोग्यसंपन्न जीवनशैली राखण्यासाठी खेळांचे महत्व याबद्दल विवेचन केले.
***
S.Tupe/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1851734)
Visitor Counter : 153