सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
भारताच्या राष्ट्रगीताच्या सार्वत्रिक रचनेच्या आवृत्तीचे प्रकाशन
दृकश्राव्य वर्णन, भारतीय सांकेतिक भाषा आणि कॅप्शन्ससह सार्वत्रिक रचनेच्या आवृत्तीमुळे दिव्यांगांसह प्रत्येकाचा समान सहभाग सुनिश्चित
Posted On:
13 AUG 2022 7:30PM by PIB Mumbai
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून अली यावर जंग राष्ट्रीय वाक् आणि श्रवण विकलांगता(दिव्यांगजन) संस्था या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाच्या स्वायत्त संस्थेने भारताच्या राष्ट्रगीताचे सार्वत्रिक रचनेमध्ये प्रकाशन केले आहे. भारताच्या राष्ट्रगीताच्या या आवृत्तीमध्ये दृष्टीहीन व्यक्तींसाठी श्राव्य/ दृश्य वर्णन आणि श्रवणदोष असलेल्या व्यक्तींसाठी भारतीय सांकेतिक भाषा आणि कॅप्शन्स( माहितीपर ओळी) अशी वैशिष्ट्ये आहेत. या ओळी 14 भारतीय भाषा आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. राष्ट्रगीताच्या या विशेष आवृत्तीचे प्रकाशन आज 13 ऑगस्ट 2022 रोजी या संस्थेकडून करण्यात आले. याविषयी अलीयावर जंग राष्ट्रीय वाक् आणि श्रवण विकलांगता(दिव्यांग) संस्थेचे[AYJNISHD(D)] प्रसारमाध्यम अधिकारी डॉ. मॅथ्यू मार्टिन यांनी पत्र सूचना कार्यालयाला माहिती देताना सांगितले की सार्वत्रिक रचना म्हणजे बहुतेक सर्व लोकांना शक्य तितक्या बहुतेक सर्व प्रकारे वापरता येऊ शकणारी आणि लक्षात येणारी रचना आहे, मग त्यांचे वय काही असो, त्यांच्यात कोणत्याही प्रकारची क्षमता किंवा अक्षमता असो. सार्वत्रिक रचनेमधील भारतीय राष्ट्रगीत आपल्या राष्ट्रगीताच्या व्याप्तीमध्ये वाढ करते. दृष्टीहीन व्यक्ती आणि श्रवणदोष असलेल्या व्यक्तींच्या विशेष शाळा आणि संस्थांमध्ये या आवृत्तीचे प्रदर्शन केले तर राष्ट्रगीताच्या अर्थबोधामध्ये सर्वांचा समान सहभाग निर्माण होऊ शकेल. भारताच्या राष्ट्रगीताच्या या आवृत्तीचे केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने(सीबीएफसी) सार्वत्रिक आणि शैक्षणिक प्रदर्शनासाठी प्रमाणीकरण केले आहे. ही आवृत्ती या संस्थेच्या मुंबईमधील संकुलातील सांकेतिक भाषा विभागात डीव्हीडी स्वरुपात देखील उपलब्ध आहे. सर्व प्रकारच्या व्यक्तींना वापरता येईल या स्वरुपातील राष्ट्रगीताची आवृत्ती संस्थेच्या यूट्युब वाहिनीवर उपलब्ध आहे. (https://www.youtube.com/channel/UCltp-Me7iLnABDKK_IMTJOg ) and in particular at this playlist (https://youtube.com/playlist?list=PL8zG3mYP9o0MxPh5L1LFAYUzeY6775vNI )
***
S.Kane/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1851597)
Visitor Counter : 158