संरक्षण मंत्रालय
गेल्या वर्षी त्रिशूल शिखर सर करताना हरवलेल्या दोन गिर्यारोहकांना शोधण्यासाठी नौदलाच्या पश्चिम विभागाने उघडली मोहीम
Posted On:
11 AUG 2022 6:59PM by PIB Mumbai
मुंबई, 11 ऑगस्ट 2022
स्वर्णिम विजय वर्ष सोहळ्याचा एक भाग म्हणून, पश्चिम नौदल कमांडने सप्टेंबर 2021 मध्ये त्रिशूल शिखर सर करण्याची मोहीम सुरू केली होती. या प्रयत्नादरम्यान, अचानक आणि अनपेक्षित हिमस्खलनामुळे पाच नौदल कर्मचाऱ्यांच्या आघाडीच्या पथकाला गंभीर अपघात झाला. लेफ्टनंट कमांडर रजनीकांत यादव एनएम, लेफ्टनंट कमांडर योगेश तिवारी, लेफ्टनंट कमांडर अनंत कुकरेती, लेफ्टनंट कमांडर शशांक तिवारी एनएम, हरिओम एमसीपीओ II (जीडब्ल्यू) एनएम आणि शेर्पा डुपका शेरिंग एनएम यांचे यात दुर्दैवी निधन झाले.

चार गिर्यारोहकांचे मृतदेह सापडले, तर दोन गिर्यारोहक, पैकी एक नौदल अधिकारी आणि शेर्पा बेपत्ता आहेत. खराब हवामान आणि हिवाळा सुरू झाल्यामुळे स्थिती असुरक्षित झाली त्यामुळे 13 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर शोध मोहीम बंद करावी लागली.
सेवेतील आदर्शाला जागत, भारतीय नौदल कधीही आपले माणूस मागे ठेवत नाही याचा पुनरुच्चार करत,10 ऑगस्ट 2022 रोजी पर्वतावर हरवलेल्या दोन गिर्यारोहकांना शोधण्यासाठी एक मोहीम उघण्यात आली .

या भावपूर्ण प्रसंगी, दिवंगतांच्या स्मरणार्थ त्रिशूल स्मारकाची स्थापना करण्यात आली आहे. भारतीय नौदलातील भावी साहसी पिढ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरेल. फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंग आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्मारकापुढे मेणबत्त्या लावून दिवंगत जवानांना आदरांजली वाहिली.

कार्यक्रमादरम्यान या शूरवीरांच्या कुटुंबीयांचाही सत्कार करण्यात आला. बेपत्ता शेर्पाच्या कुटुंबाला, यावेळी मदत निधी देण्यात आला.
हे शूरवीर सदैव स्मरणात राहतील.
S.Kulkarni/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1851016)
Visitor Counter : 110