संरक्षण मंत्रालय
स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवानिमित्त’ भारतीय तटरक्षक दलाकडून वॉकेथॉनचे आयोजन
Posted On:
11 AUG 2022 12:35PM by PIB Mumbai
गोवा, 11 ऑगस्ट 2022
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनिमित्त राष्ट्र ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत असताना, भारतीय तटरक्षक दलाने आपल्या जवानांसाठी वॉकेथॉन शर्यत आयोजित करून देशभक्तीच्या उत्साहात भर घातली. भारतीय तटरक्षक दल जिल्हा मुख्यालय 11, गोवा तर्फे आज जिल्हा मुख्यालय ते बोगमालो किनारा आणि परत असे वॉकथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. तटरक्षक दल मुख्यालय ते बागमालो किनाऱ्यापर्यंत आयोजित केलेल्या वॉकेथॉनला उपमहानिरीक्षक अरुणाभ बोस यांनी झेंडा दाखवला. सागरी किनाऱ्यांची स्वच्छता, हरित इंधन याविषयी नागरिकांनी सजगता बाळगावी असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
तटरक्षक दलाचे अधिकारी, कर्मचारी आणि संरक्षण दलाच्या दुसऱ्या विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी असे मिळून 100 नागरिकांनी वॉकेथॉनमध्ये सहभाग नोंदवला.
वॉकेथॉनदरम्यान नजिकच्या परिसरातील ग्रामस्थांना ‘हर घर (घरोघरी) तिरंगा’ मोहिमे अंतर्गत तिरंग्याचे वाटप करण्यात आले. जास्ती जास्त नागरिकांनी 13-15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरांवर ध्वज लावावे, याविषयी माहिती देण्यात आली. तसेच स्थानिकांनी सागरी किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि ‘हर घर (घरोघरी) तिरंगा’ अभियानाविषयी युवकांमध्ये जागृती करण्यात आली.
***
ST/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1850833)
Visitor Counter : 235