माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सन 1857 ते 1947 कालखंडाची दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन


अमरावती विभागीय आयुक्त डॉ दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

केंद्रीय संचार ब्युरोकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित विशेष उपक्रम

100 पेक्षा अधिक छायाचित्रांचा समावेश

Posted On: 09 AUG 2022 1:10PM by PIB Mumbai

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय व शासकीय विभागीय ग्रंथालय, सहायक ग्रंथालय संचालक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या सहकार्याने भारतीय स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या महत्वपूर्ण घटना, ऐतिहासिक स्थळे, ज्ञात व अज्ञात क्रांतिकारक आणि राष्ट्रपुरुषांची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे विभागस्तरीय प्रदर्शन दिनांक 10 ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत मोर्शी रोड वरील शासकीय विभागीय ग्रंथालयातील सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन अमरावती विभागीय आयुक्त डॉ दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते 10 ऑगस्ट, रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विभागीय ग्रंथालयातील सभागृहात करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे.

ज्ञात व अज्ञात क्रांतिकारक आणि राष्ट्रपुरुषांच्या जीवनातील महत्वपूर्ण माहिती चित्रमय आणि मजकूर रुपाने प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना बघता येईल. हे प्रदर्शन संपूर्ण राज्यात नागपुर, अमरावती, नांदेड, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर आणि मुंबई या शहरात 15 ऑगस्ट पर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने हा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. यासाठी हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

1757 ची प्लासीची लढाई, संन्यासी विद्रोह, कित्तूर विद्रोह, 1857 लढ्यातील महान क्रांतिकारक राणी लक्ष्मीबाई, झलकारी बाई, मंगल पांडे, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बेगम हजरत महल यांचे  छायाचित्र व मजकूर, राजाराममोहन  रॉय, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, रवींद्रनाथ टागोर, डॉ ​अ‍ॅनी बेझंट, पंडिता रमाबाई, मैडम भिकाजी कामा, डॉ श्यामजी कृष्णा वर्मा, लाला हरदयाल, अरविंद घोष, लाला लाजपतराय, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, चाफेकर बंधू, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, खान अब्दुल गफार खान, नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, अश्फाक उल्ला, सरोजिनी नायडू, अरुणा असफली, उषा मेहता इत्यादी स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना.

चंपारण सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, असहयोग आणि खिलाफत चळवळ, बारडोली सत्याग्रह, चौराचौरी, काकोरी काण्ड, चितगाव शस्त्रागार, हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, सविनय कायदेभंग, दांडी यात्रा, चलेजाव आंदोलन, विभाजन, स्वातंत्र्यदिन, संस्थानचे विलीनीकरण आणि संविधान सभा आदि महत्वपूर्ण घटनांचे दुर्मिळ छायाचित्र व मजकुरांच्या माध्यमातून बघता येणार आहे. तसेच स्वातंत्र्यसैनिकांविषयीची माहिती देणारे इंग्रजी, मराठी आणि हिंदी पुस्तके उपलब्ध आहे.

जास्तीत जास्त नागरिक, इतिहास अभ्यासक, संशोधक्, स्पर्धा परिक्षाचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी या विभागस्तरीय छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी इन्द्रवदनसिंह झाला यांनी केले आहे.

***

CBC Amaravati/I.Jhala/ST/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1850196) Visitor Counter : 1087