गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे मोदी@20: ड्रीम्स मीट डिलिव्हरी च्या प्रकाशन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
Posted On:
08 AUG 2022 10:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2022
केन्द्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे मोदी@20: ड्रीम्स मीट डिलिव्हरी च्या ओडिशा विभागाच्या प्रकाशन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, नरेंद्र मोदीजी यांचे व्यक्तिमत्त्व आणि 50 वर्षांचे त्यांचे सार्वजनिक जीवन थोडक्यात आणि निवडक क्षणांत मांडणे फार कठीण आहे. मोदी @ 20 म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री बनल्यापासून आतापर्यंतचा कालावधी आहे. मोदीजींनी गेली 20 वर्षे या देशाची लोकशाही, सार्वजनिक जीवन मजबूत करण्यासाठी, आधी गुजरात आणि नंतर भारताला महान बनवण्यासाठी, देशातील समस्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि समस्येवर तोडगा काढला ,आणि संपूर्ण जगात यशस्वीपणे देशाचा गौरव वाढवताना जी गाथा लिहिली गेली ती मोदी@20 आहे. जर कुणाला मोदी @ 20 समजून घ्यायचे असेल तर मोदीजींचा यापूर्वीचा तीस वर्षांचा कार्यकर्ता, स्वयंसेवक आणि समाजसेवक म्हणून झालेला प्रवास पाहणे आणि समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

अमित शाह म्हणाले की मोदी @ 20 हे पुस्तक तुम्हाला मोदीजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंची ओळख करून देते. या पुस्तकात एक संवेदनशील नेता, सुशासनासाठी काम करणारा सुधारक, समाजाच्या समस्या मुळापासून दूर करणारा समाजसुधारक आणि प्रशासक आणि पक्षाची मुळे मजबूत करून त्यांचा विस्तार करणारा नेता अशा मोदींच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचा हा परिचय आहे.

* * *
S.Kakade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1850098)
Read this release in:
Hindi