पर्यटन मंत्रालय

मुंबईच्या इंडिया टुरिझमच्या वतीने स्वातंत्र्य चळवळीशी निगडित ऐतिहासिक स्थळांच्या सहलीचे आयोजन


केंद्रीय विद्यालय आणि मुंबईच्या जय हिंद कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होणार

Posted On: 07 AUG 2022 11:26AM by PIB Mumbai

भारत छोडो चळवळीचा 80 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी मुंबई येथील इंडिया टुरिझमने तसेच भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या पश्चिम आणि मध्य प्रांतातील प्रादेशिक कार्यालयांच्या वतीने कुलाबा येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 च्या 50 विद्यार्थ्यांची तसेच मुंबईच्या जयहिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सहल आयोजित केली आहे.

या सहलीचा भाग म्हणून, विद्यार्थी मुंबई येथील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान तसेच आपल्या स्वातंत्र्य चळवळीशी निगडित इतर ठिकाणांना जसे की तेजपाल हॉल आणि मणी भवन (गांधी संग्रहालय) सोमवारी 8 ऑगस्ट 2022 रोजी भेट देतील. पर्यटन मंत्रालयाच्या प्रादेशिक स्तरावरील दोन परवानाधारक पर्यटक मार्गदर्शक विद्यार्थ्यांसमवेत असतील.

कुलाबा येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 चे विद्यार्थी हे युवा टुरिझम क्लबचे सदस्य आहेत. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पर्यटन मंत्रालयाने युवा टुरिझम क्लब्स स्थापन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. युवा टुरिझमचा दृष्टीकोन भारतीय पर्यटनाचे नवे दूत घडवणे, ज्यांना भारतातील पर्यटन शक्यतांची जाणीव असेल आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशामुळे प्रभावित होऊन ते स्वतःमध्ये पर्यटनाबाबत स्वारस्य आणि आपुलकी विकसित करतील.

****

SonalT/UmeshK/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1849330) Visitor Counter : 169


Read this release in: English