आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 प्रतिबंधक लसींची राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील उपलब्धतेची अद्ययावत माहिती
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सुमारे 196.89 कोटी पेक्षा अधिक लसमात्रा केल्या उपलब्ध
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 7.10 कोटीहून अधिक न वापरलेल्या लसमात्रा शिल्लक
प्रविष्टि तिथि:
06 AUG 2022 9:48AM by PIB Mumbai
देशभरात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाला 16 जानेवारी 2021पासून सुरूवात झाली. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा 21 जून 2021 पासून सुरू झाला. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टीने लसींची अधिक उपलब्धता, लसीच्या साठ्याविषयी आगाऊ सूचना आणि लसींची पुरवठा साखळी सुनियोजित करणे या माध्यमातून लसीकरण मोहिमेची गती वाढवण्यात आली आहे.
देशव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून, भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसींचा पुरवठा विनामूल्य करत आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या नवीन टप्प्यात केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांद्वारे उत्पादित 75 टक्के लस खरेदी करून या लसींचा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना (विनामूल्य) पुरवठा करत आहे.
|
VACCINE DOSES
|
(As on 6th Aug 2022)
|
|
SUPPLIED
|
1,96,89,26,625
|
|
BALANCE AVAILABLE
|
7,10,38,470
|
केंद्र सरकारने 196.89 (1,96,89,26,625) कोटी हून अधिक लसमात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत भारत सरकारच्या माध्यमातून विनामूल्य आणि थेट राज्य अधिग्रहण श्रेणीद्वारे पुरवल्या आहेत.
अजूनही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे 7.10 कोटीहून अधिक (7,10,38,470) लसमात्रा शिल्लक किंवा न वापरलेल्या आहेत.
***
MC/UK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1849028)
आगंतुक पटल : 210