अर्थ मंत्रालय
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने बनावट आयटीसी रॅकेट केले उध्वस्त
231.49 कोटी रुपयांची बनावट बिले बनवल्या प्रकरणी तीन कंपन्यांच्या मालकाला केली अटक
Posted On:
04 AUG 2022 9:57PM by PIB Mumbai
मुंबई, 4 ऑगस्ट 2022
कर चुकवेगिरी करणाऱ्या कंपन्यांविरोधातल्या विशेष तपास मोहिमे अंतर्गत महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने ओम इम्पेक्स आणि इतर दोन कंपन्यांचा मालक ब्रिजेश वनितलाल शहा वय 48 याला दिनांक 4.8.22 रोजी अटक केली.
यासंदर्भात ओम इम्पेक्स कंपनीच्या कामकाजाच्या ठिकाणी धाड टाकण्यात आली. यादरम्यान केलेल्या प्राथमिक तपासात असे आढळून आले की,ओम इम्पेक्स ही कंपनी आणि इतर दोन कंपन्या ब्रिजेश्वरी इंटरप्राईजेस आणि चेतना मेटल्स एलएलपी यांनी संशयित अप्रमाणिक करदात्याकडून 231.49 कोटी रुपयाच्या बनावट बिलांच्या स्वरूपात 41.67 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवले आहे. महानगर दंडाधिकारी न्यायालयाने ब्रिजेश वनीतलाल शहा याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या तपास मोहिमेत राज्याच्या मुंबई कर विभागाचे सह आयुक्त तपास- अ, सनदी अधिकारी राहुल द्विवेदी, राज्य कर विभागाचे उपआयुक्त नीळकंठ घोगरे आणि राज्याच्या कर विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कुमार राजपूत, अमोल सूर्यवंशी आणि लीना काळे यांचा समावेश होता.
चालू आर्थिक वर्षात या मोहिमेसह राज्याच्या वस्तू आणि सेवा कर विभागाने ही तिसावी अटक केली आहे. वस्तू आणि सेवा कर विभागातल्या अंतर विभागीय सहकार्य आणि आधुनिक विश्लेषणात्मक साधनं यांच्या जोरावर ही मोहीम आणखी प्रबळ होणार आहे आणि यामुळे फसवणूक करणाऱ्यांना एक संदेश जाणार आहे.
( स्रोत महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभाग)
S.Patil/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1848555)
Visitor Counter : 181