दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
टपाल कार्यालयातील काउंटरवर 25 रूपये प्रति ध्वज दराने राष्ट्रीय ध्वज विक्रीसाठी ऑनलाइन ऑर्डर सुविधा उपलब्ध
Posted On:
03 AUG 2022 8:45PM by PIB Mumbai
मुंबई, 3 ऑगस्ट 2022
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि "हर घर तिरंगा" मोहिमेअंतर्गत देशातील सर्व टपाल कार्यालयातील काउंटरवर 25/-रुपये प्रति ध्वज दराने राष्ट्रीय ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. epostoffice@indiapost.gov.in या संकेतस्थळावरही ध्वजांची ऑनलाइन ऑर्डर देता येईल. ध्वज खरेदी करण्यासाठी नागरिकांनी जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधावा.
2022 च्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने टपाल कार्यालयाने हा उपक्रम सुरू करायचा निर्णय घेतला आहे. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्र उभारणीसाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले त्यांच्या योगदानाची आठवण करून देणे यासाठी टपाल विभाग हा उपक्रम राबवत आहे. नागरिकांना हर घर तिरंगा अंतर्गत येत्या 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सर्व नागरिकांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकावण्यास प्रोत्साहित करणे अशी यामागची संकल्पना आहे.
टपाल विभागाने देशाच्या कानाकोपऱ्यात असलेली आपली व्यापक पोहोच यंत्रणा आणि मनुष्यबळाचा वापर करून या मोहिमेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांचे प्रबोधन करण्याचे ठरवले आहे.
* * *
PIB Mumbai | S.Kane/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1848092)
Visitor Counter : 335