विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सीएसआयआर-एनआयओचे वैज्ञानिक डॉ अनिन्दा मुझूमदार यांना सागरी शास्त्रासाठी राष्ट्रीय पुरस्कार
Posted On:
02 AUG 2022 3:40PM by PIB Mumbai
गोवा, 2 ऑगस्ट 2022
सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेतील वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक डॉ अनिन्दा मुझूमदार यांना सागरी शास्त्रातील कामगिरीसाठी वर्ष 2022 साठीच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ मुझूमदार यांचे भारताच्या गॅस हायड्रेट शोधन मोहिमेत महत्त्वाचे योगदान आहे. कृष्णा-गोदावरी आणि कावेरी-मन्नार खोऱ्यात शीत मिथेन प्रवाह प्रणाली शोधण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. या संशोधनामुळे कृष्णा-गोदावरी आणि मन्नार खोऱ्याचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर आले आहे. आधुनिक आणि प्राचीन सागरी गाळ/ गाळाच्या खडकांचे Fe-S-C जैव-रसायनशास्त्र जाणून घेण्यातही त्यांनी योगदान दिले आहे.
सागरी विज्ञानातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने डॉ. मुझुमदार यांना 2022 सालासाठी महासागर विज्ञानातील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. डॉ. मुझुमदार यांची नामांकित जर्नलमध्ये 50 हून अधिक प्रकाशने आहेत.
डॉ मुझूमदार यांच्या कार्याविषयी अधिका माहितीसाठी इथे क्लिक करा:
https://www.nio.org/profile/1192/dr-aninda-mazumdar
* * *
PIB Panaji | S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1847390)
Visitor Counter : 135