दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनानिमित्त मुंबई जीपीओ येथे पोस्ट-क्रॉसिंग संमेलनाचे आयोजन
महाराष्ट्र आणि गोव्यातील स्थापत्य वारसा या संकल्पनेवर आधारित पोस्टकार्डच्या एका विशेष संचाचे प्रकाशन
Posted On:
01 AUG 2022 9:32PM by PIB Mumbai
मुंबई, 1 ऑगस्ट 2022
महाराष्ट्र टपाल परिमंडळाच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय मैत्री दिना’निमित्त मुंबई सामान्य टपाल कार्यालयामध्ये (जीपीओ) पोस्ट क्रॉसिंग संमेलन आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र परिमंडळाच्या मुख्य पोस्टमास्तर जनरल वीणा श्रीनिवास यांनी या प्रसंगी विशेष टपाल तिकीट जारी केले. महाराष्ट्र आणि गोव्यातील स्थापत्य वारसा या विषयावरील पोस्टकार्डच्या विशेष संचाचे प्रकाशन करण्यात आले. भारतातील भरतकाम या संकल्पनेवर आधारित बुकमार्कच्या संचासह संमेलन विशेष पोस्टकार्ड्स देखील जारी करण्यात आली.
यावेळी बोलताना वीणा श्रीनिवास यांनी, परस्पर-सांस्कृतिक संवादाचे माध्यम म्हणून पोस्टकार्डचे महत्त्व अधोरेखित केले. आंतरराष्ट्रीय मैत्री दिन मानवजातीच्या प्रगतीसाठी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सौहार्दाची गरज अधोरेखित करतो असे पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह यांनी सांगितले.
120 हून अधिक पोस्टकार्डसची देवाण घेवाण करणारे पोस्ट-क्रॉसर्स आणि टपाल तिकीट संग्राहक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पोस्ट- क्रॉसिंग
पोस्टक्रॉसिंग हा एक असा प्रकल्प आहे जो जगभरातील लोकांना सहजरित्या जोडतो.कोणालाही जगभरातून पोस्टकार्ड पाठवता आणि प्राप्त करता येतील! हे खरे पोस्टकार्ड आहे, इलेक्ट्रॉनिक नाही !कल्पना अगदी सोपी आहे: तुम्ही पाठवलेल्या प्रत्येक पोस्टकार्डसाठी, तुम्हाला जगातील कुठूनतरी पोस्टक्रॉसरकडून पुन्हा एक पोस्टकार्ड परत मिळेल.. अधिक माहितीसाठी postcrossing.com पहा
* * *
PIB Mumbai | S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1847165)
Visitor Counter : 141