संरक्षण मंत्रालय

अकुशल लोकांना प्रशिक्षण

Posted On: 01 AUG 2022 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑगस्‍ट 2022

 

संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील  16 संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडून (डीपीएसयु), कौशल्ये सुधारणे आणि लघु उद्योगांचा समावेश असलेल्या संरक्षण क्षेत्रातील उद्योगांमध्ये रोजगारक्षमता वाढवण्यासाठी दरवर्षी स्थानिकांसह अकुशल  तरुणांना,  शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण  कायदा 1961 अंतर्गत ,विविध व्यवसायांसाठी  शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय, संरक्षणविषयक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या उदा. गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) या जहाजबांधणी कारखान्यांनी जहाजे आणि पाणबुड्यांच्या निर्मितीमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अनुक्रमे औद्योगिक आणि तंत्रशिक्षण संस्था गोवा येथे  (एसआयटीजीई ) आणि स्कूल ऑफ वेल्डिंग आणि पाइपिंग येथे उत्कृष्टता केंद्रांची  स्थापना केली आहे.

संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज राज्यसभेत  विनय दिनू तेंडुलकर यांच्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 
* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1846996) Visitor Counter : 141


Read this release in: English , Urdu , Tamil