दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय मुंबई, महाराष्ट्र परिमंडळ यांच्यावतीने 51 व्या पोस्टल निवृत्ती वेतन अदालतीचे आयोजन
Posted On:
01 AUG 2022 3:36PM by PIB Mumbai
मुंबई, 1 ऑगस्ट 2022
मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय मुंबई, महाराष्ट्र परिमंडळ यांच्यावतीने येत्या 19 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्रपरिमंडळ, मुंबई -400 001 च्या कार्यालयात टपाल विभागातील निवृत्ती वेतन धारक/ निवृत्ती वेतन धारकांच्या कुटुंबियांसाठी 51 वी पोस्टल निवृत्ती वेतन अदालतीचे आयोजन केले आहे..
महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील टपाल विभागातून सेवानिवृत्त /मृत्यू झालेल्यांच्या निवृत्तीवेतन-संबंधित लाभाच्या तक्रारी, ज्यांचा 3 महिन्यांच्या आत निपटारा केला गेला नाही, केवळ अशाच तक्रारींवर या पोस्टल निवृत्ती अदालतमध्ये विचार केला जाईल.
निव्वळ कायदेशीर मुद्द्यांचा समावेश असलेली प्रकरणे म्हणजे उत्तराधिकार, राष्ट्रीय निवृत्ती वेतन, टीबीओपी/एमएसीपी बढती, वेतन वाढवणे आणि धोरणात्मक बाबींचा समावेश असलेली शिस्तभंगाची प्रकरणे आणि डीपीसीच्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणे या अदालतमध्ये विचारात घेतली जाणार नाहीत. निवृत्ती वेतनधारकांनी त्यांची तक्रार वैयक्तिकरित्या (मोठ्या प्रमाणात किंवा इतरांच्या वतीने नाही) लेखाधिकारी/सचिव, पेन्शन अदालत, O/o मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र विभाग, मुंबई जीपीओ बिल्डीजी, दुसरा मजला, मुंबई 400 001, यांच्याकडे संलग्न केलेल्या विहित नमुन्यात तीन प्रतिलिपीत 22 ऑगस्ट 2022 रोजी किंवा त्यापूर्वी पाठवावी. 22 ऑगस्ट 2022 नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा या अदालतमध्ये विचार केला जाणार नाही.
* * *
PIB Mumbai | Jaydevi PS/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1846974)
Visitor Counter : 159