दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“आंतरराष्ट्रीय मैत्री दिनानिमित्त” टपाल विभागाकडून विशेष कॅन्सलेशन्स, चित्रमय पोस्ट कार्ड आणि बुकमार्क्स जारी

Posted On: 30 JUL 2022 7:08PM by PIB Mumbai

 

पणजी, 30 जुलै 2022

आंतरराष्ट्रीय मैत्री दिनानिमित्त आज  महाराष्ट्र मंडळाच्या मुंबई  कार्यालयाच्या मुख्य टपाल महासंचालक वीणा श्रीनिवास यांच्या हस्ते, ऑनलाईन पद्धतीने विशेष कॅन्सलेशन्स, चित्रमय पोस्ट कार्ड आणि बुकमार्क्स जारी करण्यात आले. पोस्टमास्टर जनरल  (मेल व्यवस्थापन) अमिताभ सिंग, गोवा विभागाच्या पणजी कार्यालयाचे पोस्टमास्टर जनरल   आर के जायभाये, गोवा विभागाच्या टपाल कार्यालयांचे वरिष्ठ अधीक्षक, नरसिंह स्वामी, गोवा टपाल संग्राहक आणि नाणी संग्राहक सोसायटीचे उपाध्यक्ष, आश्लेष कामत, यांच्यासह टपाल विभागाचे अनेक अधिकारी, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक या कार्यक्रमाला हजर होते.

यावेळी महाराष्ट्र आणि गोवा मंडळाच्या मुख्य टपाल महासंचालक वीणा श्रीनिवास यांनी मैत्रीचे महत्व विशद करतांना सर्व प्रकारच्या नात्यांचा मैत्री हा पाया आहे, असे सांगितले. विशेष बुकमार्क्स जारी करण्याचे वैशिष्ट्यही त्यांनी सांगितले आणि यामुळे,लोकांमध्ये वाचनाची आवड जोपासण्यास प्रोत्साहन मिळू शकेल, असेही त्या पुढे म्हणाल्या. त्यांनी यावेळी पत्र-मैत्रीच्या सुवर्णकाळाचेही स्मरण केले.

गोवा प्रदेशाच्या पणजी कार्यालयाचे पोस्टमास्टर जनरल , आर. के. जायभाये आणि टपाल महसंचालक (मेल व्यवस्थापन) अमिताभ सिंग यांनी विविध समुदायांच्या भिंती मोडून काढत, जगात शांततेला प्रोत्साहन देण्याच्या टपाल विभागाच्या पोस्टक्रॉसिंग- म्हणजे जगात कुठल्याही अज्ञात व्यक्तीला पोस्टकार्ड पाठवून, त्यांच्याकडून उत्तर येण्याच्या- मोहिमेच्या योगदानाची प्रशंसा केली.

गोवा टपाल विभागाने टपाल भवन येथे  गोव्याची 04 वी पोस्टक्रॉसिंग बैठक आयोजित केली होती जिथे पोस्टकार्ड पाठवण्यासाठी आणि जगभरातील  कोणत्याही अपरिचित लोकांकडून त्यावर उत्तर म्हणून पोस्टकार्ड परत मिळवण्यासाठीच्या पोस्टक्रॉसिंग कार्यक्रमात 15 फिलाटेलिस्ट (पोस्टकार्ड संग्राहक) सहभागी झाले होते.

***

S.Kakade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1846545) Visitor Counter : 132


Read this release in: English